वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत पाकिस्तान संघाने चांगली सुरुवात केली होती. त्यांनी सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले होते. मात्र, पुढे त्यांनी पराभवाचा ‘चौकार’ मारला. अशात त्यांना पुन्हा एकदा लय सापडली आहे. त्यांनी स्पर्धेच्या 31व्या सामन्यात मंगळवारी (दि. 31 ऑक्टोबर) बांगलादेश संघाचा 7 विकेट्सने पराभव केला. या विजयानंतर पाकिस्तानला विश्वचषक 2023 पॉईंट्स टेबलमध्येही मोठा फायदा झाला. दुसरीकडे, बांगलादेश संघ अधिकृतरीत्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला.
पाकिस्तानला मोठा फायदा
या सामन्यात बांगलादेश (Bangladesh) संघाने प्रथम फलंदाजी करताना 45.1 षटकात सर्व विकेट्स गमावत 204 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान (Pakistan) संघाने 32.3 षटकात 3 विकेट्स गमावत 205 धावा केल्या. यासह त्यांनी 7 विकेट्सने सामना खिशात घातला. या विजयामुळे पाकिस्तानला पॉईंट्स टेबलमध्ये (Pakistan Points Table) मोठा फायदा झाला.
पाकिस्तान संघाने 7 सामन्यात 3 विजय आणि 4 पराभव पत्करले. अशाप्रकारे त्यांनी 6 गुण मिळवत विश्वचषक 2023 पॉईंट्स टेबलमध्ये (World Cup 2023 Points Table) थेट पाचवे स्थान गाठले. सध्या त्यांचा नेट रनरेट -0.024 आहे. दुसरीकडे, बांगलादेश संघ 7 सामन्यात 1 विजय आणि 6 पराभवांनंतर 2 गुणांसह टेबलमध्ये नवव्या स्थानी आहे. त्यांचा नेट रनरेट -1.446 आहे. त्या खालोखाल इंग्लंड संघ असून त्यांनी 6 सामन्यात 1 विजय आणि 5 पराभवांनंतर 2 गुण मिळवत दहावे स्थान गाठले आहे.
The push for a #CWC23 semi-final spot heats up ♨
How your team is positioned in the race for the final four ➡ https://t.co/PD9scAdNO8 pic.twitter.com/reKNgNlGLo
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 1, 2023
याव्यतिरिक्त 6 गुण आणि -0.718 नेट रनरेटसह अफगाणिस्तान सहाव्या स्थानी आहे. तसेच, श्रीलंकेचे 4 गुण आहेत. त्यांचा सातवा क्रमांक आहे. नेदरलँड्स संघही 4 गुणांसह आठव्या स्थानी आहे. श्रीलंका आणि नेदरलँड्सचे गुण सारखेच आहेत, पण नेट रनरेटमध्ये फरक असल्यामुळे हा बदल आहे. श्रीलंकेचा नेट रनरेट -0.275, तर नेदरलँड्सचा नेट रनरेट -1.277 आहे.
भारत अव्वलस्थानी कायम
दुसरीकडे पॉईंट्स टेबलमधील (Points Table) वरील चार संघांबद्दल बोलायचं झालं, तर अव्वलस्थानी भारतीय संघ आहे. भारताने आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यात विजय मिळवत 12 गुणांसह अव्वलस्थान काबीज केले आहे. भारताचा नेट रनरेट +1.405 आहे. त्यानंतर +2.032 अशा सर्वोच्च नेट रनरेट आणि 10 गुणांसह दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानी आहे. याव्यतिरिक्त न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया 8 गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. मात्र, न्यूझीलंड (+1.232) चांगल्या नेट रनरेटमुळे ऑस्ट्रेलिया (+0.970) संघाला मागे टाकत तिसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. (World Cup 2023 Points Table Changes After Pakistan won by 7 wickets against bangladesh)
हेही वाचा-
‘आम्हाला माहिती होतं, तो जर टिकला…’, बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर बाबरने ‘या’ खेळाडूवर उधळली स्तुतीसुमने
कीवींना धक्का! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातूनही दिग्गज बाहेर, अधिकृत माहिती आली समोर