सध्या सर्वत्र वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची धामधूम सुरू आहे. मागील काही दिवसांपूर्वी अशी बातमी समोर आली होती की, विराट कोहली याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई बनणार असून ती प्रेग्नंट आहे. मात्र, त्यावेळी याची पुष्टी झाली नव्हती. विराट आणि अनुष्का या दोघांनीही त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. अशातच विराट आणि अनुष्काचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात अनुष्का शर्मा बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
खरं तर, भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) सध्या विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत भारतीय संघाचा भाग आहे. स्पर्धेचा आणि भारतीय संघाचा अखेरचा सामना 12 नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी भारत विरुद्ध नेदरलँड्स संघ आमने-सामने असणार आहेत. हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. भारतीय संघ (Team India) 6 नोव्हेंबर रोजीच बंगळुरूत पोहोचला आहे. तसेच, विराट कोहली आपली पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिच्यासोबत बंगळुरूत पोहोचला होता. अशातच दोघांचा व्हिडिओ समोर आला आहे.
व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत ‘विरुष्का’ (Virushka) म्हणजेच विराट आणि अनुष्का कडक सुरक्षा घेऱ्यात एकमेकांचा हात पकडून हॉटेलमधील आपल्या रूमकडे जाताना दिसत आहेत. यादरम्यान अनुष्काने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. यामध्ये अनुष्का शर्मा बेबी बंपमध्ये (Anushka Sharma Baby Bump) दिसत आहे. अनुष्का तिच्या पोटावर हात ठेवून सावकाश चालत असल्याचे व्हिडिओत दिसते.
https://twitter.com/Cric_varad/status/1722610261717332405?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1722610261717332405%7Ctwgr%5Eea34012622983007524bb04699be12d365182138%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportskeeda.com%2Fcricket%2Fnews-cwc-2023-virat-kohli-anushka-sharma-going-to-be-parents-again-actress-baby-bump-visible
डिसेंबर 2017मध्ये लग्न
विराट आणि अनुष्का (Virat And Anushka) हे क्रिकेटजगतासोबतच बॉलिवूडमधीलही रोमँटिक जोडप्यांमध्ये गणले जातात. दीर्घ काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी डिसेंबर 2017मध्ये लग्न केले होते. जानेवारी 2021मध्ये अनुष्काने मुलीला जन्म दिला होता. तिचे नाव वामिका आहे. दुसऱ्या बाळाची बातमी आल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता गगनाला भिडली आहे.
विराटचे स्पर्धेतील प्रदर्शन
विराट कोहली याच्या विश्वचषक 2023 स्पर्धेतील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर तो अक्षरश: धमाल करत आहे. स्पर्धेत खेळलेल्या 8 सामन्यात त्याने 108.60च्या सरासरीने 543 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 2 शतके आणि 4 अर्धशतके निघाली आहेत. अशात भारताला हा विश्वचषक जिंकायचा असेल, तर विराटला आगामी सामन्यातही अशाच प्रकारचे योगदान द्यावे लागेल. (world cup 2023 virat kohli and anushka sharma going to be parents again actress baby bump visible)
हेही वाचा-
वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडचा करिष्मा कायम! सलग पाचव्या वर्ल्डकपमध्ये दाखवला दम
सूर्यकुमारकडे भारताचा कर्णधार बनण्याची संधी, हार्दिक पंड्याबाबत संघ घेणार मोठा निर्णय