दिवाळीच्या खास दिवशी म्हणजेच रविवारी (दि. 12 नोव्हेंबर) भारतीय संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेच्या साखळी फेरीचा शानदार शेवट केला. भारताने अखेरच्या साखळी सामन्यात नेदरलँड्स संघाला 160 धावांनी पराभवाचा धक्का दिला. या सामन्यात रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने सर्व विभागात चमकदार कामगिरी केली. अशात सामन्यातील शानदार प्रदर्शनानंतर भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहली याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
भारतीय स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) मुंबईला पोहोचला आहे. तसेच, तो विमानतळावर पोहोचताच विराट कोहलीकडे तिथे उपस्थित पॅपराजी फोटो काढण्याची विनंती करतात. मात्र, यावेळी तो म्हणाला की, तो गाडीजवळ फोटो काढणार नाही. यावेळी विराट त्याची मुलगी वामिका हिच्या सुरक्षेची काळजी घेताना दिसला. त्याचा हा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या उपांत्य सामन्यापूर्वीचा असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडिओत विराट जरा भडकल्याचे दिसत आहे. आधी तो म्हणाला की, सकाळची वेळ आहे आणि त्याला लवकर घरी पोहोचायचे आहे. तो म्हणाला, फोटो इथेच घ्या, कारजवळ जाण्याची गरज नाही. फोटोसाठी जबरदस्ती करण्यावर विराट भडकला आणि त्याने म्हटले की, “लेकीला घरी घेऊन जायचे आहे, त्यामुळे लवकर आवरा, मी थांबू शकणार नाही.”
"Beti ko ghr leke jana hai"
Virat requested the media not to click because Vamika is with him❤️#viratkohli #anushkasharma pic.twitter.com/DqmtyBbJ1t— 𝙒𝙧𝙤𝙜𝙣🥂 (@wrognxvirat) November 13, 2023
विराट कोहलीचे नेदरलँड्सविरुद्ध प्रदर्शन
नेदरलँड्सविरुद्ध खेळताना विराट कोहली याने खास पराक्रम आपल्या नावावर केले. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाने निर्धारित 50 षटकात 4 विकेट्स गमावत 410 धावा केल्या होत्या. या धावांमध्ये विराटच्या अर्धशतकाचेही योगदान होते. विराटने 56 चेंडूंचा सामना करताना 51 धावा केल्या. यामध्ये 1 षटकार आणि 5 चौकारांचा समावेश होता. या अर्धशतकासह त्याने विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक 7 वेळा 50 हून अधिक धावा करण्याच्या सचिन तेंडुलकर याच्या विक्रमाची बरोबरी केली.
https://www.instagram.com/reel/Czko8PVrv5i/?utm_source=ig_embed&ig_rid=5c47f49a-bb34-4846-9bd0-d4e8c7cdcffb
एवढंच नाही, तर त्याने गोलंदाजी करताना 3 षटकात 13 धावा खर्चून 1 विकेटही घेतली. ही विकेट विराटने तब्बल 9 वर्षांनंतर घेतली. आता भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 15 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम येथे विश्वचषक 2023 स्पर्धेचा पहिला सामना खेळला जाणार आहे. या सामन्यातही संघाला आणि चाहत्यांना विराटकडून चांगल्या प्रदर्शनाची आशा असेल. (world cup 2023 Virat kohli refuse paparazzi to click pictures of his daughter vamika after india victory against netherlands see video)
हेही वाचा-
वर्ल्डकप 2023 मधील सुपरमॅन! यांच्या चपळ फिल्डिंगने पालटला सामन्याचा नूर
भारतीय संघाची नवी पिढी भूतकाळाचा विचार करत नाही? ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे सेमीफायनलआधी मोठे विधान