वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघ आपला पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. हा सामना चेन्नई येथील एमए चिदंबरम स्टेडिअमवर पार पडणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वीच भारतीय संघातून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा हुकमी एक्का सलामीवीर शुबमन गिल आजारी पडला आहे. शुबमन गिलला डेंग्यू झाल्याचे माध्यमांमध्ये सांगितले जात आहे.
श्रीलंका दौऱ्याहून जेव्हा संघ भारतात परतला होता, तेव्हाही भारताचे अनेक खेळाडू आजारी पडले होते. अशात माध्यमांतील वृत्तांनुसार, शुबमन गिल डेंग्यू (Shubman Gill Dengue) आजाराच्या कचाट्यात सापडला आहे.
Shubman Gill tests positive for dengue, doubtful for Sunday’s opening World Cup game against Australia ( Indian Express ) pic.twitter.com/GegsPsHD4q
— Broken Cricket (@BrokenCricket) October 6, 2023
आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तो खेळू शकणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शुबमन गिल (Shubman Gill) हा प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर झाला, तर त्याच्या जागी ईशान किशन याला सलामीला खेळण्याची संधी मिळू शकते.
आकाश चोप्राचे भाष्य
भारतीय संघाचा माजी खेळाडू आकाश चोप्रा याने यापूर्वी म्हटले होते की, वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत शुबमन गिल जबरदस्त प्रदर्शन करू शकतो. तो म्हणालेला, “माझ्या मते, विश्वचषक 2023मध्ये शुबमन गिलचा होऊ शकतो. पहिली गोष्ट अशी की, या स्पर्धेत जे टॉप-3 खेळाडू असतील, ते सर्वाधिक धावा करतील. तसेच, शुबमन गिल सलामीला खेळतो. शुबमनकडून मला खूपच अपेक्षा आहेत. तो कमीत कमी दोन शतके तरी ठोकेल आणि तीनही असू शकतात. जर तो दमला नाही, तर एखादे शतक खूपच मोठे होऊ शकते. आशिया चषकात ज्याप्रकारे त्याने शतक केले होते, माझ्या मते, ती त्याची सर्वोत्तम वनडे खेळी होती. त्याच प्रकारच्या प्रदर्शनाची आशा मला या संपूर्ण विश्वचषकात असेल.”
शानदार फॉर्ममध्ये शुबमन
शुबमन गिल याच्याविषयी बोलायचं झालं, तर त्याचा अलीकडील फॉर्म खूपच चांगला राहिला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात जबरदस्त शतक केले होते. त्याने 97 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 104 धावा केल्या होत्या. यावर्षी शुबमनचे हे पाचवे शतक आहे. तसेच, एकूण त्याने सहा शतके झळकावली आहेत. यावरून समजते की, शुबमन सध्या किती चांगल्या फॉर्ममध्ये आहे. (world cup 2023 young cricketer shubman gill tests positive for dengue ahead of australia match)
हेही वाचा-
Asian Games: सेमीफायनलमध्ये ऋतुराजसेनेचा दणदणीत विजय, बांगलादेशला नमवत मिळवलं फायनलचं तिकीट
PAK vs NED: नेदरलँडपुढे बलाढ्य पाकिस्तानचे आव्हान, आमने-सामने आकडेवारी ते हवामान; सगळंच घ्या जाणून