भारतीय संघाने पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर विश्वचषक 2023 स्पर्धेतील विजयाचा ‘चौकार’ मारला आहे. भारताने बांगलादेश संघाला 7 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. हा विश्वचषकाच्या इतिहासातील बांंगलादेशविरुद्धचा चौथा विजय ठरला. या सामन्यात भारताने विरोधी संघावर पूर्णपणे दबाव बनवला होता. मात्र, भारताच्या विजयापेक्षा जास्त चर्चा विराट कोहली याची रंगली आहे. या सामन्यात विराटने झंझावाती शतक झळकावत सर्वांच्या भुवया उंचावल्या. मात्र, शतक ठोकल्यानंतर त्याने संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजा याची माफी मागितली.
नेमकं काय झालं?
विराट कोहली (Virat Kohli) याने या एकतर्फी सामन्यात शतक झळकावत रंगत आणली. एकेवेळी सर्वांना असे वाटत होते की, विराट शतकाला मुकेल. मात्र, विराटने हुशारीने एकापाठोपाठ एक शानदार फटके खेळले आणि मैदानावर धावून शतकाच्या जवळ पोहोचला. त्यानंतर जेव्हा विजयासाठी 2 आणि शतकासाठी 3 धावांची गरज असताना विराटने नसुम महमूद टाकत असलेल्या 42व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर खणखणीत षटकार मारत शतक झळकावले. या कामगिरीसाठी विराटला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. खरं तर, या पुरस्काराचा खरा हक्कदार रवींद्र जडेजा होता. त्याने सामन्यादरम्यान शानदार प्रदर्शन केले.
जडेजाने या सामन्यात महत्त्वाच्या 2 विकेट्स आणि एक जबरदस्त झेलही पकडला होता. मात्र, शतकानंतर जेव्हा विराट पुरस्कार घेण्यासाठी पोहोचला, तेव्हा विराटने जडेजाची माफी मागितली (Virat apologizes to Jadeja). विराटच्या शतकामुळे भारताने 257 धावांचे आव्हान 41.3 षटकात पार केले.
काय म्हणाला विराट?
विराट कोहलीने सामन्यानंतर म्हटले की, “जड्डूकडून हे घेण्याबद्दल माफी मागू इच्छितो. मी एक मोठे योगदान देऊ इच्छित होतो. मी विश्वचषकात काही अर्धशतके केली आहेत. मात्र, वास्तवात मला त्यांना मोठ्या खेळीत बदलता आले नाही. मी यावेळी खेळ संपवू इच्छित होतो आणि शेवटपर्यंत टिकून खेळू इच्छित होतो, जे मी अनेक वर्षांपासून केले आहे. मी शुबमनला म्हणत होतो की, जर तू या स्थितीबाबत स्वप्न पाहत असशील, तर तू फक्त झोपशील. तू हा विचार करणार नाही की, हे वास्तविक आहे. ही सुरुवात माझ्यासाठी स्वप्नासारखी होती. पहिले चार चेंडू, दोन फ्री-हिट, एक षटकार आणि एक चौकार.”
विराट पुढे बोलताना म्हणाला की, “हे तुम्हाला शांत ठेवते आणि खेळात घेऊन जाते. खेळपट्टी खूपच चांगली होती आणि याने मला माझा खेळ खेळण्याची परवानगी दिली. फक्त चेंडू योग्य वेळी मारणे, खेळाडू नसलेल्या ठिकाणी मारणे, जोरात धावणे आणि जेव्हाही गरज पडेल, तेव्हा बाऊंड्री मिळवणे. चेंजिंग रूममध्ये खूप चांगले वातावरण आहे. आम्हाला एकमेकांसोबत चांगले वाटत आहे. मैदानावर प्रत्येकजण ही भावना पाहू शकतो. त्यामुळे हे मैदानही अशाप्रकारे अनुवाद करत आहे. आम्हाला माहिती आहे की, ही एक मोठी स्पर्धा आहे. तुम्हाला चेंज रूममध्ये काही वेग निर्माण करण्याची गरज आहे, जेणेकरून लोक बाहेर येऊन अशाप्रकारे खेळू शकतील. या सर्वांपुढे घरच्या मैदानात खेळणे खूपच चांगले आहे. आम्ही याचा जास्तीत जास्त फायदा घेऊ इच्छितो.”
विराटची खेळी
या सामन्यातील विराटच्या खेळीविषयी बोलायचं झालं, तर त्याने बांगलादेशच्या 257 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 97 चेंडूंचा सामना केला. यामध्ये त्याने 4 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 103 धावा चोपल्या. हे त्याचे वनडेतील 48वे, तर आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 78वे शतक ठरले. आगामी सामन्यातही विराटकडून सर्वांना अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. (world cup 2923 centurion virat kohli apologized to ravindra jadeja after scoring century for potm ind vs ban match read)
हेही वाचा-
विश्वचषकाच्या 18व्या सामन्यात AUS vs PAK आमने-सामने, कोण किती पाण्यात? घ्या जाणून
बांगलादेशला धोबीपछाड देताच रोहितचे सर्वात मोठे विधान; म्हणाला, ‘सामनावीर पुरस्कार त्याला दिला पाहिजे…’