भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी आता केवळ पाच दिवस शिल्लक आहेत. आपल्या याच वर्ल्ड कप काढून मालिकेतील पाचव्या आकड्याचे मानकरी ठरले आहेत भारताचा विश्वविजेता कर्णधार एमएस धोनी आणि भारताचा महान सलामीवीर वीरेंद्र सेहवाग. या दोघांनी विश्वचषकात पाच आकड्याशी संबंधित अशी काय कामगिरी केली हे आपण पाहूया.
आपल्या बेधडक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सेहवाग याने कारकिर्दीत तीन वनडे विश्वचषक खेळले. या सर्व विश्वचषकांत त्याची एकतरी खेळी सर्वांसाठी लक्षात राहणारी ठरली. 2003 विश्वचषकाच्या सुपर 6 फेरीतील महत्त्वाच्या सामन्यात त्याचे पहिले अर्धशतक आले. त्यानंतर अंतिम सामन्यात इतर फलंदाजांनी नांग्या टाकल्या असताना त्यांनी एकतर्फी झुंज देताना 85 धावांची खेळी केली.
वेस्ट इंडीजमध्ये झालेल्या 2007 वनडे विश्वचषकात बर्मुडा विरुद्ध त्याने 114 धावांची खेळी केली. मात्र, बांगलादेश व श्रीलंका विरुद्ध त्याला प्रभाव पडत आला नाही. 2011 विश्वचषकाची सुरुवात त्याने 175 धावांच्या वादळी खेळीने केली. मात्र, त्यानंतर केव्हा दक्षिण आफ्रिका विरुद्ध 73 धावा सोडल्यास त्याला विशेष छाप पाडता आली नाही. मात्र, तो दरवेळी संघाला आक्रमक सुरुवात देण्यात यशस्वी ठरला होता. अशा पद्धतीने त्याने वनडे विश्वचषकात पाच वेळा 50 + धावांचा टप्पा पार केला.
सेहवागप्रमाणेच धोनीही विश्वचषकात पाच वेळा 50 पेक्षा अधिक धावा करू शकला आहे. धोनीने आपला पहिला विश्वचषक 2007 मध्ये खेळला. मात्र, या विश्वचषकात तो एकही अर्धशतक करू शकला नव्हता. त्याला आपले पहिले विश्वचषक अर्धशतक साजरे करण्यासाठी वाट पाहावी लागली 2011 च्या अंतिम सामन्याची. श्रीलंकेविरुद्ध त्याने नाबाद 91 धावा करत भारताला विजेते बनवण्यात सिंहाचा वाटा उचलला. 2015 विश्वचषकात झिम्बाब्वेविरूद्ध 85 धावांची नाबाद खेळी करून त्याने भारताला विजय मिळवून दिला होता. याच विश्वचषकात उपांत्य सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक झळकावले. मात्र, तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
विश्वचषकातील त्याचे अखेरचे अर्धशतक हे त्याच्या कारकिर्दीतील अखेरच्या सामन्यात म्हणजे 2019 वनडे विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात न्युझीलंडविरुद्ध आले. वैयक्तिक 50 धावांवर धोनी बाद झाल्यानंतर भारताच्या विजयाच्या आशा देखील संपुष्टात आल्या होत्या.
(World Cup Countdown MS Dhoni And Virendra Sehwag Hits 5 Fifty Each In World Cup)
विश्वचषक विशेष-
वर्ल्डकप स्पेशल: World Cupमध्ये सर्वाधिक धावा करणारे Top 10 कर्णधार; यादीत फक्त दोनच भारतीय
बॅटिंग ते बॉलिंग, बेन स्टोक्सने 2019च्या वर्ल्डकपमध्ये केलेला कहर; World Cup 2023मध्ये वाढणार इंग्लंडची ताकद
किस्से वर्ल्डकपचे: आणि मलिंगाचे ‘ते’ चार चेंडू इतिहासात अजरामर झाले
किस्से वर्ल्डकपचे: गप्टिलचा थ्रो स्टम्पसवर नव्हेतर भारतीयांच्या हृदयावर लागलेला