निवृत्त क्रिकेटपटूंमध्ये सुरू असलेल्या लीजेंड्स लीग क्रिकेट २०२२ (Legends Cricket League 2022) चा तिसरा सामना शनिवारी (२२ जानेवारी) वर्ल्ड जायंट्स विरुद्ध इंडियन महाराजा (World Giants vs Indian Maharajas) संघात झाला. इंडियन महाराजांनी प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ३ बाद २०९ धावा केल्या. परंतु इमरान ताहिरच्या ताबडतोब अर्धशतकामुळे त्याच्या शतकी खेळीवर पाणी फेरले. वर्ल्ड जायंट्सने ३ चेंडू शिल्लक असताना २१० धावा ३ विकेट्सने हा सामना खिशात घातला आहे.
व्हिडिओ पाहा- अतिशय महान खेळाडू जेव्हा स्वार्थापोटी आपली महानता विसरले
इमरान ताहिरने पालटला डाव
इंडियन महाराजांच्या २१० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वर्ल्ड जायंट्सची सुरुवात खराब झाली होती. सुरुवातीच्या ६ षटकातच त्यांचे आघाडीचे २ फलंदाज स्वस्तात पव्हेलियनला परतले होते. मात्र सलामीवीर केविन पीटरसनने २७ चेंडूत ५३ धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला होता. परंतु तोही अर्धशतक पूर्ण करत आपली विकेट गमावून बसला. पुढे यष्टीरक्षक ब्रॅड हॅडिन (२१ धावा), कर्णधार डॅरेन सॅमी (२८ धावा) आणि मॉर्नी मॉर्केल (२१ धावा) यांनी थोडेफार योगदान दिले.
शेवटी वर्ल्ड जायंट्सचा पराभव निश्चित वाटत असताना गोलंदाज इमरान ताहिर (Imran Tahir)ने झंझावाती अर्धशतक ठोकले. केवळ १९ चेंडूंचा सामना करताना ५ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने त्याने नाबाद ५२ धावा केल्या. परिणामी वर्ल्ड जायंट्सने १९.३ षटकातच इंडियन महाराजाचे लक्ष्य गाठले. इंडियन महाराजाकडून मुनाफ पटेल आणि स्टुअर्ट बिन्नी यांनी सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
Imran Tahir ! You Beauty 🔥
52 off 19 balls 💥#Cricket #LegendsLeagueCricket @llct20 pic.twitter.com/B1Hxoz6w9p— Mustafa Abid (@mmustafa_abid) January 22, 2022
नमन ओझाची शतकी खेळी
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना इंडियन महाराजाकडून सलामीवीर नमन ओझा (Naman Ojha) आणि कर्णधार मोहम्मद कैफ यांनी मोठ्या खेळी खेळल्या होत्या. ओझाने ६९ चेंडूंचा सामना करताना ९ षटकार आणि १५ चौकारांच्या मदतीने लीजेंड्स लीग क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले. तो १४० धावांवर बाद झाला. तर कर्णधार कैफने ४७ चेंडूत ५३ धावा केल्या होत्या. या डावात वर्ल्ड जायंट्सकडून रायन जय साइडबॉटमने सर्वाधिक २ विकेट्स काढल्या होत्या.
लीजेंड्स लीग क्रिकेटमधील पहिलेवहिले शतक करण्याचा मान मिळवणाऱ्या ओझाला या सामन्याचा सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या-
अफगानी कर्णधार त्याच्या मुलासोबत खेळू इच्छितोय आंतरराष्ट्रीय क्रिकेट; म्हणाला, ‘आशा आहे की आम्ही…’
हे कोरोना! टीम इंडियाच्या बहुप्रतिक्षित मालिका आयोजनात करावे लागले बदल; वाचा सविस्तर
नमन ओझाची झंझावाती शतकी खेळी; लिजेंड्स लीगचा पहिला शतकवीर होण्याचा मिळविला मान
हेही पाहा-