---Advertisement---

टेबल टेनिस महिला एकेरीत भारताची मनिका ऑस्ट्रियाच्या सोफियापुढे सपशेल फ्लॉप, नुकतेच केले होते दमदार पुनरागमन

---Advertisement---

टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये चौध्या दिवसाची (२६ जुलै) सुरुवात जरी भारतासाठी चांगली झाली असली, तरीही पुढे भारताला पराभवाचाच सामना करावा लागला आहे. भारत आणि ऑस्ट्रिया संघात झालेल्या टेबल टेनिस महिला एकेरीच्या तिसऱ्या राऊंडमध्ये भारताच्या मनिका बत्राला अपयश मिळाले. ती ऑस्ट्रियाच्या सोफिया पोल्कानोसमोर सपशेल फ्लॉप ठरली असून सोफियाने तिला ४-० ने पराभूत केले आहे.

मनिकाला सोफियाने ११-८, ११-२, ११-५, आणि ११-७ ने पराभवाचं पाणी पाजलं. अशाप्रकारे मनिका ऑलिंपिकमधून बाहेर पडली आहे. (World No. 17 Sofia Polcanova Beats Manika Batra 4-0 in 3rd round clash)

यापूर्वी झालेल्या दोन्ही सामन्यात मनिकाने दमदार कामगिरी केली होती. तिने पहिल्या राऊंडमध्ये ग्रेट ब्रिटनच्या टिनटिन हो हिला पहिल्या राऊंडमध्ये ४-० ने पराभूत केले होते. त्यानंतर दुसऱ्या राऊंडमध्ये तिने युक्रेनच्या मार्गारेटा पेसोत्स्कावर ४-३ ने दणदणीत विजय मिळवला होता.

आता टेबल टेनिसमध्ये पुरुष एकेरीत फक्त शरत कमल हा भारताचा एकमेव खेळाडू राहिला आहे.

विशेष म्हणजे मनिकाला सन २०२० मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-

-तिरंदाजीमधून आनंदाची बातमी! भारतीय संघाने कझाखस्तानचा ६-२ ने उडवला धुव्वा; उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश

-टोकियो ऑलिंपिक: भारताची निराशाजनक सुरुवात, नेमबाज मनु आणि यशस्विनी पदकाच्या शर्यतीतून ‘आऊट’

-बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची विजयी सुरुवात, मोठ्या अंतराने प्रतिस्पर्धी पोलिकारपोव्हाला चारली धूळ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---