नवी दिल्ली, ३ नोव्हेबंर २०२३ : जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेला स्टार टेनिसपटू डॅनिएल मेदव्हेदेव्ह हा जागतिक टेनिस लीगमध्ये ( WTL) पुनित बालन समुहाच्या ( PBG) संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. पुनित बालन समुहाने (PBG) शुक्रवारी WTLच्या दुसऱ्या सत्रात संघासह जागतिक क्रीडा क्षेत्रात प्रवेश केल्याची घोषणा केली.
ही स्पर्धा २१ ते २४ डिसेंबर या कालावधीत अबुधाबीमधील यास बेटाच्या इतिहाद एरिना येथे होणार आहे. जिथे जगातील १६ सर्वोत्तम टेनिस स्टार्स या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत सहभागी होणार आहेत आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. पुनित बालन समूहाच्या मालकीच्या संघाचे नाव ‘पीबीजी ईगल्स’ असे आहे.
पुनित बालन समुहाने यापूर्वीच भारतातील विविध क्रीडा लीगमधील नऊ संघांमध्ये गुंतवणूक केली आहे आणि या गटात आता पॉवर-पॅक स्क्वॉड दिसेल, ज्यामध्ये जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेला आंद्रे रुबलेव्ह देखील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसेल.
“जागतिक क्रीडा संपत्ती निर्माण करण्याच्या पुनित बालन समुहाच्या समर्पणात लक्षणीय प्रगती करत, जागतिक टेनिस लीगचा एक भाग होण्यासाठी आम्ही उत्साहित आहोत. जगातील टेनिस प्रतिभांपैकी काही आधीच आमच्या फ्रँचायझीचा भाग आहेत, आम्ही अतुलनीय आणि रोमांचकारी टेनिसने भरलेल्या हंगामाची आतुरतेने अपेक्षा करत आहोत. इतर क्रीडा विभागातील आमच्या यशाप्रमाणेच येथे विजेतेपद पटकावण्याचे आमचे ध्येय आहे,” असे पुनित बालन समुहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पुनित बालन यांनी सांगितले.
प्रीमियर हँडबॉल लीग, अल्टीमेट टेबल टेनिस, अल्टीमेट खो खो, महाराष्ट्र प्रीमियर लीग प्रीमियर बॅडमिंटन लीग, प्रो पंजा आणि ग्लोबल चेस लीग यासह भारतातील सर्व प्रमुख क्रीडा लीगमध्ये पुनिल बालन समुहाचे संघ आहेत. त्याचसोबत पुनित बालन समुह जवळपास ६० प्रतिभावान खेळाडूंना देखील सपोर्ट करतो. जागतिक टेनिस लीगमधील एका संघासह पुनित बालन समुहाचा क्रीडा जगतात सहभाग आणि वचनबद्धतेचा महत्त्वपूर्ण प्रभाव पडत आहे.
पुनित बालन समुहाचे स्वागत करताना जागतिक टेनिस लीगचे अध्यक्ष राजेश बंगा म्हणाले, “पुनित बालन समुह जागतिक टेनिस लीग परिवारात सामील झाल्यामुळे आम्ही त्यांचे हार्दिक स्वागत करतो. खेळांच्या वाढीसाठी आणि प्रचारासाठी त्यांचे समर्पण आमच्या ध्येयाशी संरेखित होते. लीगची पातळी उंचावण्याचे तसेच वर्षातील जागतिक दर्जाची टेनिस स्पर्धा बनवण्याचे वचन देते.
मेदव्हेदेव्हने २०२१ अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली आणि या वर्षीच्या विम्बल्डनमध्ये उपांत्य फेरी गाठली. अबू धाबीमध्ये होणाऱ्या लीगमधून वर्षाच्या उत्कृष्ट कामगिरी करण्याकडे त्याचे लक्ष असेल. मेदव्हेदेव्ह याने भारतीय संघाकडून खेळण्याचा आपला उत्साह शेअर केला. तो म्हणाला, “गेल्या वर्षी या लीगमध्ये खेळाडूंनी काय अनुभवले ते पाहिल्यानंतर, अबूधाबी येथील जागतिक टेनिस लीगच्या या हंगामात सहभागी होताना मला आनंद होत आहे. मी यूएईमध्ये अनेक वेळा खेळलो आहे आणि येथे परत येण्याचा मला नेहमीच आनंद वाटतो. मी हे वर्ष तिथे सकारात्मकतेने पूर्ण करण्याचे ध्येय ठेवत आहे.”
जागतिक टेनिस लीगमध्ये चार संघांमध्ये खेळाडूंची विभागणी करणारे आकर्षक स्वरूप असेल. पहिल्या ते तिसऱ्या दिवसापर्यंत प्रत्येक दिवशी दोन सामने नियोजित केले जातील, ज्यामध्ये मिश्र दुहेरीसह पुरुष व महिला एकेरी-दुहेरीचा समावेश असेल. त्यानंतर २४ डिसेंबर रोजी अव्वल दोन संघ विजेतेपदासाठी लढतील.
‘ग्रेटेस्ट शो ऑन कोर्ट’ म्हणून ओळखला जाणारा, हा कार्यक्रम १२५ हून अधिक देशांमध्ये प्रसारित केला जाईल आणि त्यात महिलांची जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाची आरीना सॅबालेंका, २०२३ ऑस्ट्रेलियन ओपनची अंतिम फेरीतील स्पर्धक स्टेफानो त्सित्सिपास आणि चार वेळा ग्रँड स्लॅम विजेती इगा स्विएटेक यांचाही समावेश असेल. (World No. 3 Medvedev will lead the Punit Balan Group in the World Tennis League)
महत्वाच्या बातम्या –
ओम दळवी मेमोरियल डॉ.नितु मांडके करंडक अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीजमध्ये देशतून 200हून अधिक खेळाडू सहभागी
कर्णधार शाहिदी पुन्हा ठरला ‘हिरो’, नाबाद अर्धशतक ठोकत नेदरलँड्सला नमवलं, गुणतालिकेत अफगाणिस्तानची मोठी झेप