---Advertisement---

IND vs PAK । जगातील नंबर एकच्या फलंदाजाने हार्दिक पंड्यापुढे टेकले गुडघे, उडाला त्रिफळा

On: सोमवार, सप्टेंबर 11, 2023 8:42 PM
Jasprit Bumrah Babar Azam
---Advertisement---

सोमवारी (11 सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना खेळला गेला. रविवारी (10 सप्टेंबर) पावसामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या शतकी खेळीमुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभी केली. प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांनी पहिल्या दोन विकेट्स स्वस्तात मिळवल्या. हार्दिक पंड्या याने बाबर आझम याचा त्रिफळा उडवला.

पाकिस्तानला या सामन्यात जिंकण्यासाठी 357 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. पाकिस्तानच्या डावातील पाचव्या षटकात जसप्रीत बुमराह (Hardik Pandya) याने सलामीवीर इमाम-इल-हक याला तंबूत पाठवले. त्यानंतर कर्णधार बाबर आझम यानेही पावरप्ले नंतर पहिल्या म्हणजे 11व्या षटकात विकेट गमावली. हार्दिक पंड्या या षटकात गोलंदाजी करत असून इनस्विंग चेंडूवर बाबरचा त्रिफळा उडवला. बाबरने 24 चेंडूत अवघ्या 10 धावा केल्या.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1701244395108913201?s=20

(World number one batsman Babar Azam was clean bowled by Hardik Pandya)

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पंड्या, ईशान किशन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज

पाकिस्तान – फखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहिम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ व नसीम शाह.

महत्वाच्या बातम्या – 
वनडेत बुमराहचे जोरात कमबॅक! पावर प्लेमध्ये दिल्ला पाकिस्तानला मोठा झटका
भारताचे पहिले चारही फलंदाज चमकले! विराट-राहुलच्या शतकामुळे संघाची धावसंख्या साडेतीनशे पार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---