---Advertisement---

शेवटचा सामना जिंकत ‘राहुल आर्मी’ धोक्यात आणणार पाकिस्तानचा विक्रम! वाचा काय आहे गणित

On: रविवार, ऑगस्ट 21, 2022 12:33 PM
KL-Rahul-Babar-Azam-Zimbabwe
---Advertisement---

झिम्बाब्वेविरुद्ध खेळलेला दुसरा वनडे सामना खिशात घातला. एकदिवसीय क्रिकेटमधला झिम्बाब्वेविरुद्ध भारताचा हा ५३ वा विजय आहे. त्याचबरोबर पाकिस्तानने यासंघाविरुद्ध याआधी सर्वाधिक सामने जिंकले आहेत. पाकिस्तानने या फॉरमॅटमध्ये ५४ वेळा झिम्बाब्वेचा पराभव केला आहे. टीम इंडियाने मालिकेतील शेवटच्या सामन्यात यजमानांना हरवले तर पाकिस्तानशी बरोबरी साधली जाईल. या यादीत बांगलादेश ५१ विजयांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

झिम्बाब्वेविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय सामने जिंकणारा संघ-
पाकिस्तान – ५४
भारत – ५३*
बांगलादेश – ५१
श्रीलंका – ४६
विशेष म्हणजे केएल राहुलने पहिले आंतरराष्ट्रीय शतक झिम्बाब्वे विरुद्ध झळकावले होते. त्यानंतर कर्णधार म्हणून पहिला सामना अन् पहिली मालिकाही त्याने झिम्बाब्वेविरुद्ध जिंकली आहे. त्यामुळे शेवटचा सामना जिंकत रहुल पाकिस्तानली देखील झटका देण्याच्या तयारीत असेल.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

VIDEO। ‘बाबर आझम म्हणजे क्रिकेटमधला मेस्सी अन् रोनाल्डो’, पाकिस्तानी अष्टपैलू बरळला

आता काय म्हणावे? मोठे मनाने ज्याला ऑटोग्राफ दिला, त्याच चाहत्याने चोरलं खेळाडूचं ५६ लाखांचं घड्याळ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---