---Advertisement---

‘WTC फायनलमध्ये एका सामन्याऐवजी तीन सामने पाहिजे होते,’ विश्वविजेत्या भारतीय कर्णधाराचे परखड मत

On: गुरूवार, मे 27, 2021 3:46 PM
Team India (Virat Kohli, R Ashwin, Rohit Sharma)
---Advertisement---

येत्या १८ ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या मोठ्या सामन्यासाठी दोन्हीही संघ कसून सराव करत आहेत. या सामन्यात भारतीय संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जाते आहे. कारण, भारतीय संघाने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. अशातच आता भारताचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांनीही या सामन्याबद्दल मोठे भाष्य केले आहे.

कसोटी क्रिकेटकडे क्रिकेट चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी आयसीसीने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले होते.२०१९ मध्ये सुरू झालेल्या स्पर्धेत ९ संघांनी सहभाग घेतला होता. यामधून भारत आणि न्यूझीलंड, या दोन्ही बलाढ्य संघांनी अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम सामन्यात विजय मिळवणारा संघ कसोटी क्रिकेटच्या विश्वचषकाचा विजेता ठरणार आहे. अशातच दिग्गज भारतीय खेळाडू, कपिल देव यांचे म्हणणे आहे की, विजयी संघ एक सामन्याच्या आधारे नव्हे तर एकापेक्षा अधिक सामन्यांच्या आधारे ठरवता आला असता तर बरे झाले असते.

कपिल देव यांनी म्हटले आहे की, “ही एक चांगली बाब आहे की, आयसीसी कसोटी क्रिकेटला लोकप्रिय बनवण्याच्या प्रयत्नात आहे. मला विश्वास आहे की, लोकांना हे नक्की आवडेल. माझे असे मत आहे की, जर विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत ३ कसोटी सामने खेळवले गेले असते तर बरे झाले असते.”

लॉर्ड्समध्ये अंतिम सामना खेळवण्यात आला असता तर आणखी बरे झाले असते. 

कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९८३ मध्ये विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेतील अंतिम सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवण्यात आला होता. याच जुन्या आठवणींना उजाळा देत कपिल देव यांनी पुढे म्हटले की,” हा अंतिम सामना रोज बाऊल ऐवजी लॉर्ड्समध्ये खेळवण्यात आला असता तर बरे झाले असते. लॉर्ड्स हे ऐतिहासिक मैदान आहे. मॅंचेस्टर देखील उत्तम पर्याय ठरू शकला असता, परंतु लॉर्ड्सच्या मैदानावर विजयी चषक उंचावण्याची मजा काही वेगळीच आहे.” अंतिम सामना लॉर्ड्समध्येच खेळवण्यात येणार होता परंतु, बायो बबलमुळे हा सामना रोज बाऊल स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्टेडियमच्या जवळ हॉटेलची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे खेळाडूंना जास्त प्रवास करावा लागणार नाही. यामुळे बायो बबलचे नियम पाळवे सोपे होणार आहे.

दोन्ही ही संघात उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज

पुढे ते म्हणाले की,” भारतीय फलंदाजांची खरी चाचणी तर अंतिम सामन्यात होणार आहे. मी असे मुळीच म्हणत नाही की, गोलंदाज हे फलंदाजांपेक्षा उत्कृष्ट आहेत. भारतीय संघ संतुलित आहे, परंतु भारतीय संघाची फलंदाजी मजबूत आहे. आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की, भारतीय संघातील फलंदाज साउथॅम्प्टनच्या मैदानावर कशी फलंदाजी करतात. न्यूझीलंड आणि भारत संघात उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज आहेत. ”

येत्या २ जूनला इंग्लंडला होणार रवाना

भारतीय संघातील खेळाडू १९ मे पासून मुंबईत विलगिकरणात आहे. येत्या २ जूनला ते इंग्लंडच्या दिशेने रवाना होणार आहेत. तसेच न्यूझीलंड संघातील खेळाडू इंग्लंडमध्येच आहेत. त्यांना विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी इंग्लंड संघाविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.

हेही वाचा-
WTC Final: भारताची ही जोडी खूपच खतरनाक, न्यूझीलंडच्या बड्या फलंदाजाने घेतली धसकी
WTC फायनल: तीन महत्वाचे खेळाडू, ज्यांचे दमदार प्रदर्शन टीम इंडियाला बनवेल कसोटी क्रिकेटचा किंग
मुंबईत जन्मलेला न्यूझीलंडचा हा फिरकीपटू भारतीयांची उडवणार दाणादाण, WTC फायनलसाठी आहे उत्सुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---