---Advertisement---

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या तारखेत बदल, जाणून घ्या नवे वेळापत्रक

On: सोमवार, जानेवारी 25, 2021 6:03 PM
---Advertisement---

आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पुढे ढकलण्यात आल्याची नुकतीच घोषणा करण्यात आली असून नवीन वेळापत्रकानुसार हा सामना १८ ते २२ जून या कालावधीत खेळवला जाणार आहे. तसेच २३ जून हा दिवस या सामन्यासाठीचा राखीव दिवस असेल.

यापूर्वी हा सामना १० ते १४ जून या कालावधीत खेळवण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र सामन्याच्या आयोजनाच्या तारखेत बदल करण्यात आला असला तरी आयोजन स्थळात बदल करण्यात आलेला नाही. हा अंतिम सामना पूर्वनियोजित ठिकाणीच म्हणजेच इंग्लंडच्या लॉर्डस् मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंतिम सामन्याच्या तारखेतील बदल आयपीएलच्या संभावित तारखांच्या दृष्टीतून करण्यात आला आहे. आयपीएलच्या निश्चित तारखा अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी संभावित तारखा आणि खेळाडूंना विलगीकरणात जावे लागल्यास लागणारा कालावधी, हे लक्षात घेऊन हा बदल करण्यात आल्याचे वृत्त आहे. तसेच भारतीय संघ या सामन्याचा भाग असेल, हे जवळपास निश्चित झाल्याने ते देखील या बदलात लक्षात घेतले गेले आहे.

सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीत पाच मालिकेतील ४३० गुणांसह भारतीय संघ आणि ४२० गुणांसह न्यूझीलंडचा संघ अव्वल दोन क्रमांकावर आहेत. या स्पर्धेच्या अंतर्गत भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध आणखी एक कसोटी सामन्यांची मालिका खेळणार असून तिसऱ्या क्रमांकावरील ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करणार आहे. आयसीसीच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीकडे आता क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल.

महत्वाच्या बातम्या:

केवळ फलंदाजीतच नाही तर गोलंदाजीतही रुटची कमाल! बनला अशी कामगिरी करणारा पहिलाच क्रिकेटर

शाकिब अल हसनची अनोख्या विक्रमाला गवसणी, ही कामगिरी करणारा जगातला पहिला क्रिकेटपटू

दोन हजाराहून अधिक कसोटी सामने झाले, पण असा विक्रम पहिल्यांदाच झाला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---