---Advertisement---

पराजयानंतर नेतृत्त्वपद सोडा कोहलीला WTC प्लेइंग XIमध्येही मिळाली नाही जागा, पाहा संपूर्ण संघ

On: रविवार, जून 27, 2021 8:43 AM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कसोटी क्रिकेटकडे चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला २०१९ मध्ये प्रारंभ झाला होता. तर क्रिकेटविश्वातील ९ कसोटी मान्यताप्राप्त असलेल्या संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. तब्बल २ वर्ष चाललेल्या या स्पर्धेत अनेक मोठमोठे विक्रम घडले. तसेच स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या बलाढ्य संघामध्ये खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंड संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. या विजयानंतर, विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची प्लेइंग ११ घोषित करण्यात आली आहे. ज्यामध्ये भारतीय कर्णधाराला स्थान देण्यात आले नाही.

ईएसपीएन क्रिकइन्फोने स्पर्धेचा शेवट होताच क्रिकेट विशेषज्ञ आणि चाहत्यांना, कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची प्लेइंग इलेव्हन निवडण्यास सांगितले होते. या संघात भारतीय कर्णधार विराट कोहलीला स्थान देण्यात आले नाही. तर भारतीय संघातून रोहित शर्मा, आर अश्विन आणि रिषभ पंत यांना जागा देण्यात आली आहे. न्यूझीलंड संघाला विश्वविजेता बनवणाऱ्या कर्णधार केन विलियमसनला या संघाचे देखील कर्णधारपद देण्यात आले आहे. तसेच या विश्वविजेत्या संघातील आणखी दोन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यामध्ये काइल जेमिसन आणि टीम साउदी यांचा समावेश आहे.

तसेच ऑस्ट्रेलियन संघाकडून स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांना जागा देण्यात आले होते. सलामी फलंदाज म्हणून, श्रीलंकन संघाचा दिमुथ करूनारत्ने आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून इंग्लंडच्या बेन स्टोक्सला निवडण्यात आले आहे. या संघामध्ये पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि वेस्ट इंडिज या संघातील खेळाडूंना जागा मिळाली नाही. (World test championship playing 11 announced)

रोहित शर्माने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत केल्या आहेत १०९४ धावा
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा हा या स्पर्धेत चांगल्याच फॉर्ममध्ये होता. त्याने १२ सामन्यांमध्ये ६१ च्या सरासरीने तब्बल १०९४ धावा कुटल्या आहेत. यामध्ये ४ शतकांचा समावेश आहे. तसेच रिषभ पंतने ३९ च्या सरसरीने ७०७ धावा केल्या. दरम्यान त्याने स्पर्धेत एकही शतक झळकावले आहे.

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची प्लेइंग इलेव्हन – रोहित शर्मा, दिमुथ करुणारत्ने, मार्नस लाबुशेन, केन विलियमसन, स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, रिषभ पंंत, काइल जेमिसन, आर अश्विन, पॅट कमिन्स , टिम साउदी.

महत्वाच्या बातम्या-

अन् त्या खेळीनंतर केपीला संबोधलं गेलं होतं ‘द मोस्ट कम्प्लिट बॅट्समन इन क्रिकेट’

केविन-युवराजमधील भांडणानंतर इंग्लंडच्या दिग्गजाने मारला होता अल्टी-पल्टी शॉट, वाचा तो रोमांचक किस्सा

ज्या फोटोमुळे धोनी झाला ट्रोल, त्या फोटोमागील खरं कारण जाणून तुम्हीही म्हणाल, ‘वाह माही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---