लंडन। आज(29 जून) 2019 विश्वचषकातील 37 वा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात लॉर्ड्स मैदानावर सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पण ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज ऍरॉन फिंचने 8 धावांवरच विकेट गमावली आहे. पण असे असले तरी त्याने काही खास विक्रम केले आहेत.
फिंचने 2019 विश्वचषकात खेळताना 500 धावांचा टप्पा पार केला आहे. त्याच्या या विश्वचषकात 8 सामन्यात 63 च्या सरासरीने 504 धावा झाल्या आहेत. त्यामुळे फिंच हा एका विश्वचषकात 500 धावा पूर्ण करणारा एकूण सहावा सलामीवीर फलंदाज ठरला आहे.
याआधी सलामीला फलंदाजी करताना एका विश्वचषकात 500 धावांचा टप्पा सचिन तेंडुलकर, मेथ्यू हेडन, तिलकरत्ने दिलशान, मार्टीन गप्टील आणि डेव्हिड वॉर्नर यांनी पार केला आहे. यामध्ये सचिनने 1996 आणि 2003 या दोन विश्वचषकात खेळताना प्रत्येकी 500 धावांचा टप्पा पार केला आहे.
विशेष म्हणजे फिंचचा सहकारी सलामीवीर वॉर्नरनेही 2019 च्या विश्वचषकातच 500 धावांचा टप्पा पार केला आहे. त्याने इंग्लंड विरुद्ध 25 जूनला खेळताना 2019 च्या विश्वचषकात 500 धावा पूर्ण केल्या होत्या.
त्यामुळे एका विश्वचषकात 500 धावांचा टप्पा दोन सलामीवीर फलंदाजांनी पार करण्याची ही विश्वचषक इतिहासातील पहिलीच वेळ आहे.
त्याचबरोबर फिंच हा एका विश्वचषकात 500 पेक्षा अधिक धावा करणारा केवळ तिसरा कर्णधार ठरला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धनेने असा कारनामा केला आहे. या दोघांनीही 2007 च्या विश्वचशषकात त्यांच्या संघाचे नेतृत्व करताना 500 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या.
#एकाच विश्वचषकात 500 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारे सलामीवीर –
1996 – सचिन तेंडूलकर (523 धावा)
2003 – सचिन तेंडूलकर (673 धावा)
2007 – मेथ्यू हेडन (659 धावा)
2011 – तिलकरत्ने दिलशान (500 धावा)
2015 – मार्टीन गप्टील (547 धावा)
2019 – डेव्हिड वाॅर्नर (516 धावा*)
2019 – ऍरॉन फिंच (504 धावा*)
#एकाच विश्वचषकात 500 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारे कर्णधार –
2007 – माहेला जयवर्धने (548 धावा)
2007 – रिकी पाँटिंग (539 धावा)
2019 – ऍरॉन फिंच (504 धावा*)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–भारताविरुद्धच्या सामन्यानंतर विंडीजच्या या खेळाडूला आयसीसीने सुनावली शिक्षा, जाणून घ्या कारण
–करुणारत्ने असा नकोसा विक्रम करणारा विश्वचषक इतिहासातील पहिलाच कर्णधार
–खुद्द रोहित शर्मानेच दिला विंडीज विरुद्ध तो नाबाद असल्याचा पुरावा






