लंडन। आज(14 जूलै) आयसीसी 2019 क्रिकेट विश्वचषकातील अंतिम सामना लॉर्ड्स मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघात सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यात विजयी होणाऱ्या संघाला पहिल्यांदाच विश्वचषक उचलण्याची संधी मिळणार आहे. याआधी इंग्लंड आणि न्यूझीलंड संघाने आत्तापर्यंत एकदाही विश्वचषक जिंकलेला नाही. त्यामुळे इंग्लंड आणि न्यूझीलंडचे खेळाडू पहिल्यांदाच विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरले असतील.
पण आज या सामन्यासाठी मैदानावर उपस्थित असणाऱ्यांपैकी एक व्यक्ती असा आहे जो विश्वचषक विजेत्या संघाचा भाग आहे. तो व्यक्ती म्हणजे आज मैनावर पंच म्हणून काम पहाणारे कुमार धर्मसेना.
धर्मसेना हे 1996 च्या विश्वचषक विजेत्या श्रीलंका संघाचे भाग होते. त्यांचा 1996 च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यासाठी 11 जणांच्या श्रीलंका संघातही समावेश होता. त्यांनी अंतिम सामन्यात गोलंदाजी करताना स्टिव्ह वॉ यांची विकेट घेतली होती.
आजच्या सामन्यासाठी श्रीलंकेचे कुमार धर्मसेना यांच्याबरोबर आणि साऊथ आफ्रिकेचे मारियास इरासमस हे मैदानावरील पंच असणार आहेत. मारियास यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाही.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषक २०१९: न्यूझीलंड-इंग्लंड सामना टाय झाला तर हा संघ होणार विश्वविजेता…
–सेमीफायनलमध्ये हरल्यानंतरही टीम इंडियाला मिळणार कोट्यावधी रुपये
–एमएस धोनीला रनआऊट केल्याबद्दल मार्टिन गप्टिल म्हणतो…