मँचेस्टर। आज(16जून) भारत विरुद्ध पाकिस्तान संघात आयसीसी 2019 विश्वचषकात 22 वा सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 336 धावा केल्या आहेत. भारताकडून सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतकी खेळी केली.
रोहितने आज 113 चेंडूत 140 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 3 षटकार मारले. रोहितचे हे वनडे क्रिकेटमधील 24 वे शतक आहे.
त्याने या सामन्यात केएल राहुलबरोबर सलामीला 136 धावांची सलामी भागीदारीही रचली. तसेच राहुल 57 धावांवर बाद झाल्यानंतर रोहितने दुसऱ्या विकेटसाठी कर्णधार विराट कोहलीबरोबर 98 धावांची भागीदारी केली.
याबरोबर रोहितने या सामन्यात अनेक विक्रमांनाही गवसणी घातली आहे. त्यातील हे काही खास विक्रम –
#1. वनडे विश्वचषकात सर्वाधिक शतके करणारे भारतीय क्रिकेटपटू –
6 – सचिन तेंडुलकर
4 – सौरव गांगुली
3 – शिखर धवन/रोहित शर्मा
#2. वनडे विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध खेळताना शतक करणारा रोहित शर्मा भारताचा दुसरा क्रिकेटपटू. याआधी विराटने 2015 च्या विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध ऍडलेडच्या मैदानात 107 धावांची शतकी खेळी केली होती.
#3. वनडे विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या –
143* – अँड्र्यू सायमंड, 2003, जोहान्सबर्ग
140 – रोहित शर्मा, 2019, मँचेस्टर
131* – रॉस टेलर, 2011, पालेकेले
#4. इंग्लंडमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारे खेळाडू –
18 डाव – रोहित शर्मा
19 डाव – शिखर धवन
#5. वनडेमध्ये सर्वाधिकवेळा 125 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारे क्रिकेटपटू –
19 वेळा – सचिन तेंडूलकर
15 वेळा – रोहित शर्मा
13 वेळा – विराट कोहली
12 वेळा – ख्रिस गेल
10 वेळा – सनथ जयसुर्या
#6. सर्वात जलद 24 वे वनडे शतक करणारे क्रिकेटपटू –
142 डाव – हाशिम अमला
161 डाव – विराट कोहली
194 डाव – एबी डिविलियर्स
203 डाव – रोहित शर्मा
219 डाव – सचिन तेंडुलकर
#7. इंग्लंडमध्ये भारताकडून सर्वाधिक वनडे शतके करणारे क्रिकेटपटू –
4 – शिखर धवन/रोहित शर्मा
3 – सचिन तेंडुलकर
2 – राहुल द्रविड
#8. पाकिस्तान विरुद्ध सलग दोन वनडे सामन्यात शतकी खेळी करणारा रोहित शर्मा पहिला भारतीय. आजच्या सामन्याआधी 2018 मध्ये दुबईत पार पडलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात रोहितने नाबाद 111 धावांची खेळी केली होती.
#9. विश्वचषक स्पर्धेत पहिल्या तीन डावात सलग 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारे भारतीय क्रिकेटपटू –
नवज्योत सिंग सिद्धू – 1987 (सलग 4 डावात)
सचिन तेंडुलकर – 1996 (सलग 4 डावात)
युवराज सिंग – 2011 (सलग 3 डावात)
रोहित शर्मा – 2019 (सलग 3 डावात)
#10. वनडेमध्ये सलग 5 डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारे भारतीय क्रिकेटपटू –
सचिन तेंडुलकर – 1994
विराट कोहली – 2012
विराट कोहली – 2013
अजिंक्य रहाणे – 2017-18
रोहित शर्मा – 2019
#11. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय क्रिकेटपटू –
358 षटकार – रोहित शर्मा
355 षटकार – एमएस धोनी
264 षटकार – सचिन तेंडुलकर
251 षटकार – युवराज सिंग
247 षटकार – सौरव गांगुली
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषक २०१९: किंग कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये रचला मोठा इतिहास!
–तिकीटांची मागणी करणाऱ्या चाहत्यांना विराट कोहलीने दिला मजेशीर संदेश, पहा व्हिडिओ
–विश्वचषक २०१९: ‘द वॉल’ राहुल द्रविडला मागे टाकत एमएस धोनीने केला हा खास पराक्रम