---Advertisement---

विश्वचषक २०१९: न्यूझीलंड विरुद्ध अशी असू शकते ११ जणांची टीम इंडिया

---Advertisement---

नॉटिंगहॅम। आज(13 जून) विश्वचषक 2019 स्पर्धेत 18 वा सामना न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात पार पडणार आहे. हा सामना ट्रेंट ब्रिज मैदानावर होणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

या सामन्यासाठी भारतीय संघाचा नियमित सलामीवीर फलंदाज शिखर धवन अंगठ्याच्या दुखापतीमुळे उपलब्ध असणार नाही. त्यामुळे आज त्याच्या ऐवजी केएल राहुल रोहित शर्मासह सलामीला उतरेल. मात्र राहुल सलामीला फलंदाजी करणार असल्याने भारतासमोर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणार कोण, असा प्रश्न उभा राहिला आहे.

भारताकडे या क्रमांकावर फलंदाजीसाठी विजय शंकर आणि दिनेश कार्तिकचा पर्याय आहे. त्यामुळे कदाचीत कार्तिकला त्याच्या अनुभवामुळे आज चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी संधी दिली जाऊ शकते.

त्याचबरोबर मागील दोन दिवस नॉटिंगहॅममध्ये पाऊस पडत असल्याने खेळपट्टीत ओलावा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय संघ कदाचीत तीन वेगवान गोलंदाज घेऊन मैदानात उतरु शकतो.

असे झाल्यास आज मोहम्मद शमीला संधी मिळेल. तसेच कुलदीप यादव किंवा युजवेंद्र चहल यांच्यातील एकाला बाहेर बसावे लागू शकते. कुलदीपची मागील दोन सामन्यातील कामगिरी खास झालेली नाही. त्यामुळे कदाचीत कुलदीपच्या ऐवजी शमी 11 जणांच्या संघात सामील होऊ शकतो. याव्यतिरिक्त जास्त काही बदल भारतीय संघात होण्याची शक्यता नाही.

या सामन्याआधी या विश्वचषकात भारताने दोन सामने खेळले आहेत. तर न्यूझीलंडने तीन सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे एकाही सामन्यात या दोन्ही संघांनी अजून पराभव स्विकारलेला नाही. त्यामुळे आज विजयाची लय कोण कायम ठेवणार हे पहावे लागेल.

असा असू शकतो न्यूझीलंड विरुद्ध 11 जणांचा भारतीय संघ – 

विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, दिनेश कार्तिक, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

डेव्हिड वॉर्नरने चक्क सामनावीर पुरस्कार दिला या लहान चाहत्याला, पहा व्हिडिओ

किंग कोहलीला आज मास्टर ब्लास्टरला मागे टाकत विश्वविक्रम करण्याची सुवर्णसंधी

धवनच्या दुखापतीबाबत फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांचा मोठा खूलासा, पंतबद्दलही केले भाष्य

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment