---Advertisement---

चहर-अर्शमूळे दक्षिण आफ्रिका फर्शवर! सर्व प्रकारच्या टी20 मधील सर्वात लाजिरवाणी कामगिरी केली नावावर

On: बुधवार, सप्टेंबर 28, 2022 8:03 PM
---Advertisement---

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला बुधवारी (28 सप्टेंबर) तिरुअनंतपुरम येथे सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आशिया चषकानंतर डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने शानदार पुनरागमन करत दक्षिण आफ्रिकेचा डाव उध्वस्त केला. त्याला दीपक चहरने देखील तितकीच समर्थपणे साथ दिली.

 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत बाकावर बसावे लागल्यानंतर दीपक चहर व अर्शदीप सिंग यांनी भारतीय संघात पुनरागमन केले. दीपकने पहिल्या शतकाच्या अखेरच्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमा याचा त्रिफळा उडवत संघाला पहिला बळी मिळवून दिला. त्यानंतर दुसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या अर्शदीपने दुसऱ्या चेंडूवर क्विंटन डी कॉक, पाचव्या चेंडूवर रायली रुसो आणि अखेरच्या चेंडूवर डेव्हिड मिलर यांच्या दांड्या वाकवत दक्षिण आफ्रिकेच्य डावाची वाताहात केली. तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर दीपकने पुन्हा एकदा बळी मिळवला. त्याने युवा फलंदाज ट्रिस्टन स्टब्सला अर्शदीपकरवी झेलबाद केले. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 5 बाद 9 अशी होती.

दक्षिण आफ्रिकेने 2.3 षटकात गमावलेले पाच बळी टी20 इतिहासातील कोणत्याही फलंदाजी संघाची लाजिरवाणी कामगिरी आहे. आंतरराष्ट्रीय टी20, सहयोगी देश तसेच कोणत्याही लीग आणि देशांतर्गत क्रिकेटमधील कोणत्याही संघाने इतकी खराब कामगिरी केलेली नव्हती.‌

यापूर्वी 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेचे वेस्ट इंडिज विरुद्ध 10 धावांमध्ये पाच बळी गेले होते. 2010 मध्ये न्यूझीलंडला 11 व 13 धावांवर आपला निम्मा संघ गमवावा लागला होता. अनुक्रमे पाकिस्तान व श्रीलंकेविरुद्ध त्यांच्यावर अशी नामुष्की ओढवलेली. तर 2012 मध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचे 19 धावांवर 5 बळी टिपलेले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘टी-20 हा फलंदाजांचा खेळ’, भारताविरुद्धची मालिका सुरू होण्याआधी आफ्रिकी गोलंदाजांचे मोठे विधान
भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेविषयी दक्षिण आफ्रिकी कर्णधाराचे मोठे विधान, पाहा काय म्हणाला बावुमा 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---