रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाची धुरा सांभाळणारा फाफ डू प्लेसिस आयपीएल 2023 स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये आहे. फाफ या स्पर्धेत आपल्या शानदार फलंदाजीने विक्रमांचे मनोरे रचत आहे. तो या हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. आता त्याच्या नावावर आणखी एक विक्रमाची नोंद झाली आहे. फाफने हा विक्रम आयपीएल 2023च्या 54व्या सामन्यात मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात पार पडला. हा विक्रम करताच फाफ आरसीबीचा सहावा खेळाडू ठरला. चला विक्रम जाणून घेऊयात…
झाले असे की, या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाकडून प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली (Virat Kohli) आणि फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) यांनी डावाची सुरुवात केली. यावेळी विराट जेसन बेहरेनडॉर्फच्या पहिल्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर झेलबाद झाला. यावेळी विराटला 1 धावेवर तंबूत परतावे लागले. मात्र, कर्णधार फाफने मैदानावर टिकत 15व्या षटकापर्यंत टिच्चून फलंदाजी केली. फाफ 15व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर झेलबाद झाला. मात्र, यावेळी त्याने खास विक्रम नावावर केला.
फाफ डू प्लेसिसचा विक्रम
फाफने यावेळी 41 चेंडूत 65 धावांची वादळी खेळी केली. या धावा करताना त्याने 3 षटकार आणि 5 चौकारांचाही पाऊस पाडला. हे त्याचे हंगामातील सहावे अर्धशतक होते. 65 धावांची खेळी करताच फाफ आरसीबीसाठी 1000 हून अधिक धावांचा टप्पा पार करणारा सहावा फलंदाज ठरला. आयपीएल 2022च्या मेगा लिलावात आरसीबीच्या ताफ्यात सामील झालेल्या फाफने अवघ्या 27 सामन्यात 41.76च्या सरासरीने 1044 धावा केल्या आहेत. यामध्ये 9 अर्धशतकांचा समावेश आहे.
1⃣0⃣0⃣0⃣ Faf-tastic runs in the Red & Gold! 🫡🔥#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2023 #MIvRCB pic.twitter.com/biNC7npRKu
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 9, 2023
याव्यतिरिक्त आयपीएल 2023मध्ये फाफने 11 सामने खेळताना 57.60च्या सरासरीने सर्वाधिक 576 धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानी यशस्वी जयसवाल असून त्याच्या 11 सामन्यात 477 धावा आहेत.
आरसीबीसाठी सर्वाधिक धावा विराटच्या
विराट कोहली हा आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. याव्यतिरिक्त तो आरसीबीसाठीही सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. विराटने आतापर्यंत 234 सामने खेळताना 36.49च्या सरासरीने 7044 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 शतके आणि 50 अर्धशतकांचा समावेश आहे.
गुणतालिकेत आरसीबी सहाव्या स्थानी
मुंबईविरुद्ध भिडण्यापूर्वी आरसीबी संघाने या हंगामात आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. त्यातील 5 सामन्यात आरसीबीला विजय, तर 5 सामन्यात पराभवाचा धक्काही सहन करावा लागला आहे. यासह 10 गुण मिळवत संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. मुंबईविरुद्धचा सामना जिंकला, तर आरसीबी संघ गुणतालिकेत गरुडझेप घेऊ शकतो. (wow Faf du Plessis completes 1000 runs for RCB)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आधी संघातून स्वत:च झाला बाहेर, आता भारतात वर्ल्डकपमध्ये खेळण्याची इच्छा केली व्यक्त, कोण आहे तो?
Toss : 12 गुणांसाठी भिडायला मुंबई अन् बेंगलोर तयार; नाणेफेक जिंकत हिटमॅनचा गोलंदाजीचा निर्णय