महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला पुढील 4 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या लीगमध्ये एकूण 5 संघ भाग घेणार आहेत. या लीगला सुरुवात होण्यापूर्वी स्पर्धेचा लिलाव सोमवारी (दि. 13 फेब्रुवारी) मुंबई येथे पार पडला. या लिलावात देश-विदेशातील खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. एकूण 87 खेळाडूंवर बोली लागली. मात्र, यामध्ये अशा अनेक खेळाडू होत्या, ज्यांच्यावर बोली लागली नाही. त्यापैकीच एकीने आता सोशल मीडियावर दु:ख शेअर केले आहे. तिची ही पोस्ट सर्वत्र चर्चेत आहे.
महिला प्रीमिअर लीग 2023 (Womens Premier League 2023) स्पर्धेच्या पहिल्या-वहिल्या लिलावात स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) हिच्यावर सर्वाधिक बोली लावली गेली. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाने 3 कोटी 40 लाख रुपयांची ऐतिहासिक बोली लावत मंधानाला आपल्या ताफ्यात सामील केले. मंधानानंतर स्पर्धेची दुसरी सर्वात महागडी खेळाडू ही ऑस्ट्रेलियाची अष्टपैली ऍशले गार्डनर (Ashleigh Gardner) ठरली. तिला गुजरात जायंट्स संघाने 3 कोटी 20 लाख रुपयांमध्ये ताफ्यात सामील केले.
परंतु मंधाना आणि गार्डनर यांसारखे इतर खेळाडूंची नशीब चमकले नाही. अनेकांना या लिलावात खरेदीदार मिळाला नाही. ती खेळाडू इतर कुणी नसून इंग्लंडची फलंदाज डॅनियल वॅट (Danielle Wyatt) आहे. तिला एकाही संघाने ताफ्यात सामील केले नाही. लिलावात खरेदीदार न मिळाल्यामुळे डॅनियल खूपच निराश झाली, तिने ट्वीट करत दु:ख मांडले आहे.
काय म्हणाली डॅनियल?
ट्वीट करत डॅनियल म्हणाली की, “महिला प्रीमिअर लीगमध्ये खेळण्याची स्वप्न पाहिले होते. मन तुटलं आहे. संघांनी ज्यांना लिलावात खरेदी केले, त्या सर्वांचे अभिनंदन. भारत हे क्रिकेट खेळण्यासाठी एक शानदार ठिकाण आहे.”
Dreamt of playing in the WPL. Heartbroken 💔 Congrats to all who got picked up. India is a wonderful place to play cricket
— Danielle Wyatt (@Danni_Wyatt) February 14, 2023
डॅनियलची गणना इंग्लंडच्या धडाकेबाज फलंदाजांमध्ये होते. तिच्या नावावर 140 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 2276 धावा आहेत. या धावा तिने 124हून अधिकच्या स्ट्राईक रेटने चोपल्या आहेत. डॅनियल ही फलंदाजीव्यतिरिक्त गोलंदाजीतही तितकीच माहीर आहे. विशेष म्हणजे, तिने या क्रिकेट प्रकारात गोलंदाजी करताना 46 विकेट्सदेखील चटकावल्या आहेत.
डॅनियल वॅट ही विराट कोहली (Virat Kohli) याच्यामुळेही चर्चेत राहिली आहे. तिने सोशल मीडियावर थेट विराटला प्रपोज केले होते. त्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये डॅनियल जोरदार चर्चेत राहिली होती. (wpl 2023 cricketer danielle wyatts heart broke after unsold in the wpl auction)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘वॅलेंटाईन्सन डे’ची वेळ साधून पृथ्वी शॉकडून गर्लफ्रेंडच्या नात्यावर शिक्कामोर्तब, लिहिले…
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला ‘हा’ भारतीय खेळाडू, जसप्रीत बुमराहचा निर्णयही झाला