---Advertisement---

WPL 2023: मुंबईचा 9 विकेट्सने धुव्वा उडवत दिल्ली अव्वलस्थानी, कॅप्सीने पाडला षटकारांचा पाऊस

---Advertisement---

वुमेन्स प्रिमियर लीगमध्ये सोमवारी (20 मार्च) दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स असा खेळला गेला. गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानावर असलेल्या या संघातील या सामन्यात दिल्लीने वर्चस्व गाजवले. गोलंदाजांनी मुंबईच्या तगड्या फलंदाजीला केवळ 109 धावांवर रोखल्यानंतर केवळ एक फलंदाज गमावत दिल्लीने नऊ विकेट्सने विजय साजरा केला. या विजयासह दिल्ली गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचली.

https://twitter.com/wplt20/status/1637856134064410629?t=s-hTTYaKWxR4AZGXa6DhhQ&s=19

 

दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तिसऱ्याच षटकात हा निर्णय योग्य ठरला. आतापर्यंत स्पर्धेत धमाकेदार कामगिरी केलेल्या यास्तिका भाटिया व नॅट सिव्हर-ब्रंटला मारिझान कापने सलग चेंडूंवर बाद करत मुंबईची घसरगुंडी घडवली. त्यानंतर पुढील षटकातील तिसऱ्या चेंडूवर शिखा पांडे हिने हायली मॅथ्यूजला माघारी पाठवले. एमेलिया कर ही देखील फारसे योगदान देऊ शकली नाही. यानंतर हरमनप्रीत कौरने 23, पुजा वस्त्राकारने 26 व इझी वॉंगने 23 धावा केल्याने मुंबईला शंभरी पार करता आली. दिल्लीसाठी काप, जेनासन व शिखा पांडेने प्रत्येकी दोन बळी मिळवले.

विजयासाठी मिळालेल्या 110 धावांचा पाठलाग करताना दिल्लीला मेग लॅनिंग व शफाली वर्मा यांनी पुन्हा एकदा धुवाधार सलामी दिली. दोघांनी 4.3 षटकात 56 धावा कुटल्या. शफालीने 15 चेंडूवर 33 धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या एलिस कॅप्सीने अक्षरशा षटकारांचा पाऊस पडला. तिने लॅनिंगसह नाबाद भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. कॅप्सीने 1 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने 38 व लॅनिंगने 32 धावा केल्या. याविजयासह दिल्ली गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचली. ‌‌‌

(WPL 2023 Delhi Capitals Beat Mumbai Indians By 9 Wickets Clinch Top Spot)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘ग्रेस’फुल विजयासह युपी वॉरियर्झ WPL एलिमिनेटरमध्ये! आरसीबी-गुजरात स्पर्धेबाहेर
जय भोलेनाथ! विराट-राहुलनंतर उमेश यादवही पोहोचला महाकालेश्वराच्या दरबारी, भल्या पहाटे घेतले दर्शन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---