इंडियन प्रीमिअर लीगच्या धर्तीवर बीसीसीआयने महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचे आयोजन केले. ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडत आहे. आता ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहोचली असून, स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (26 मार्च) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर दिल्ली कॅपिटल्स महिला विरुद्ध मुंबई इंडियन्स महिला संघात पार खेळला जाणार आहे. ही लढत जितकी दोन संघांची आहे तितकीच दोन कर्णधारांची देखील असल्याचे आपल्याला पाहायला मिळेल.
स्पर्धेत या दोन्ही संघांनी शानदार कामगिरी केली. एकेवेळी मुंबई इंडियन्स महिला संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी होता. मात्र, नंतर दिल्ली कॅपिटल्स महिला संघाने अव्वलस्थान मिळवले. त्यानंतर दोन्ही संघांनी स्पर्धेतील प्रत्येकी 6 सामने जिंकले. दिल्लीने चांगल्या रनरेटच्या आधारे थेट अंतिम सामन्यात धडक दिली. तसेच, मुंबईने एलिमिनेटर सामन्यात युपीला पराभूत करत अंतिम फेरीत जागा मिळवली.
ट्रॉफी कोण उंचावणार याकडे सर्वांचे लक्ष असतानाच, मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्याकडे दिल्लीची कर्णधार असलेल्या मेग लॅनिंगचा बदला घेण्याची संधी असेल. मेग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचे तर हरमनप्रीत भारताचे नेतृत्व करते. 2020 टी20 विश्वचषकात लॅनिंगने आपल्याच नेतृत्वात ऑस्ट्रेलियाला विजेतेपद मिळवून दिलेले. त्यावेळी त्यांनी हरमनप्रीत नेतृत्व करत असलेल्या भारतीय संघाचा पराभव केलेला. त्यानंतर 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत देखील भारतीय संघाचा पराभव झालेला. त्यावेळी देखील याच दोन्ही खेळाडूंनी आपापल्या देशाचे नेतृत्व केलेले. तसेच, अवघ्या महिनाभरापूर्वी झालेल्या टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत देखील ऑस्ट्रेलियाने भारताला पाणी पाजलेले.
त्यामुळे या सर्व पराभवांचे उट्टे काढण्यासाठी हरमनप्रीत नक्कीच तयारी करेल. दुसरीकडे, कर्णधार म्हणून 4 टी20 व 1 वनडे विश्वचषक जिंकलेली लॅनिंग या स्पर्धेचे पहिलेच विजेतेपद आपल्या कॅबिनेटमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करेल.
(WPL 2023 Final This Is Battle Between Captain Harmanpreet Kaur And Meg Lanning)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
…आणि सीएसके सोडण्याच्या तयारीत असलेला जडेजा नरमला, धोनीची शिष्टाई आली कामी
नंबर वन यारी! रिषभला भेटण्यासाठी पोहोचले भारतीय दिग्गज, म्हणाले, ‘फिनिक्स पक्षासारखी भरारी घे’