वुमेन्स प्रिमियर लीगच्या पहिल्या हंगामात बुधवारी (8 मार्च) गुजरात जायंट्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हा सामना खेळला गेला. स्पर्धेतील आपला पहिला विजय शोधत असलेल्या या दोन्ही संघातील या सामन्यात संघर्ष पाहायला मिळाला. मात्र, गुजरात जायंट्सने दिलेल्या 202 धावांचा पाठलाग करताना आरसीबीने अखेरच्या षटकात लागोपाठ बळी गमावल्याने संघाला 11 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. गुजरातचा हा स्पर्धेतील पहिलाच विजय ठरला. तर, आरसीबीचा हा सलग तिसरा पराभव ठरला.
.@GujaratGiants have held their nerve & how! 👍 👍
They beat #RCB by 11 runs to seal their first win of the #TATAWPL! 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/QeECVTM7rl #GGvRCB pic.twitter.com/rukQmQAzu9
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 8, 2023
ब्रेबॉर्न स्टेडियम येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात गुजरातची कर्णधार स्नेह राणा हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मेगन शूटने सामन्यातील पहिले षटक निर्धाव टाकले. मात्र, दुसऱ्या षटकात सोफिया डंकली हिने एलिस पेरीला चौकार ठोकत सुरुवात केली. त्यानंतर तिने एक हाती आरसीबीच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. पुढील तीन षटकातच तिने संघाला 5 षटकात 59 अशी मजल मारून दिली. यादरम्यान तिने केवळ 18 चेंडूवर आपले अर्धशतक पूर्ण केले. हे स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. तिने 65 धावांची खेळी केली. ती बाद झाल्यानंतर हरलीन देओलने संघाचे जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. तिने 45 चेंडूवर 67 धावा केल्या. इतर फलंदाजांच्या उपयुक्त योगदानाच्या जोरावर गुजरातने 201 पर्यंत मजल मारली.
या धावांचा पाठलाग करताना आरसीबीला स्मृती मंधाना व सोफी डिवाईन यांनी अर्धशतकी भागीदारी केली. स्मृती 18 धावाांवर बाद झाल्यानंतर सोफी व पेेरी यांनी आत्मविश्वासाने संघाची गाडी पुढे नेली. मात्र, पेरी बाद झाल्यानंतर सोफीने आपले अर्धशतक पूर्ण केले. परंतु, तिची खेळी 66 धावांच्या पुढे जाऊ शकली नाही. हिदर नाईटने नाबाद 30 धावा केल्या. परंतु, ती संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.
(WPL 2023 Gujarat Giants Beat RCB By 15 Runs And Register First Win)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सच्या ‘बिग बॉय’ने गाजवला पीएसएलचा पहिलाच सामना! रावळपिंडीत बॅटने आणले वादळ
टीम इंडियाला ‘ओव्हर कॉन्फिडन्ट’ म्हणताच भडकला कॅप्टन रोहित, शास्त्रींच्या ‘त्या’ वक्तव्याचा घेतला समाचार