शुक्रवारी (दि. 10 मार्च) महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील आठवा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध यूपी वॉरियर्झ संंघात पार पडला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात आरसीबी संघाने पुन्हा एकदा निराशाजनक प्रदर्शन केले. आरसीबीला या एकतर्फी सामन्यात यूपी संघाकडून 10 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. आरसीबीचा हा स्पर्धेतील सलग चौथा पराभव आहे. या पराभवामुळे त्यांचा प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याचा मार्ग खूपच कठीण झाला आहे. मात्र, दुसरीकडे, यूपी संघाने मिळवलेल्या या विजयामुळे त्यांनी इतिहास रचला आहे.
महिला प्रीमिअर लीग 2023 (Womens Premier League 2023) स्पर्धेत स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिच्या नेतृत्वातील आरसीबी (RCB) संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी एलिस पेरी हिच्या 52 धावांच्या अर्धशतकाच्या जोरावर सर्व विकेट्स गमावत 138 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र, यूपीने अवघ्या 13 षटकातच एकही विकेट न गमावता 139 धावा करत हा आव्हानाचा डोंगर सर केला. हा विजय मिळवण्यात यूपीच्या सलामीवीर देविका वैद्य (Devika Vaidya) आणि कर्णधार एलिसा हिली (Alyssa Healy) यांचा मोठा वाटा होता. देविकाने नाबाद 36, तर हिलीने नाबाद 96 धावा करत स्पर्धेतील दुसरा सामना नावावर केला. तसेच, संघाने खास विक्रमही नोंदवला.
Haar ke baad jitne walon ko Warrioz kehte hai 🔥#RCBvUPW #UPWarriorzUttarDega #WPL pic.twitter.com/Vj4JtKXZgl
— UP Warriorz (@UPWarriorz) March 10, 2023
यूपीचा विक्रम
यूपी वॉरियर्झ (UP Warriorz) संघ या स्पर्धेत एकही विकेट न गमावता म्हणजेच दहाच्या दहा विकेट्सने सामना जिंकणारा पहिला संघ बनला आहे. यापूर्वी खेळलेल्या 7 सामन्यात एकाही संघाला 10 विकेट्सने सामना जिंकण्यात यश आले नाही. मात्र, यूपीने हा कारनामा करून दाखवला.
स्पर्धेतील आतापर्यंतचे विजय
स्पर्धेतील विजयांचा आढावा घेतला, तर पहिला सामना मुंबईने सर्वाधिक 143 धावांनी जिंकला होता. दुसरा सामना दिल्लीने 60 धावांनी नावावर केला होता. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात यूपीने 3 विकेट्सने आपला पहिला सामना जिंकला होता. चौथ्या सामन्यात पुन्हा मुंबईने 9 विकेट्सने बाजी मारली. पाचव्या सामन्यात दिल्लीने 42 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर सहाव्या सामन्यात गुजरातला 11 धावांनी विजय मिळवण्यात यश आले. यानंतर मुंबईने सातव्या सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवत सलग तिसरा सामना खिशात घातला.
9️⃣6️⃣* runs
4️⃣7️⃣ balls
1️⃣8️⃣ fours
1️⃣ six@ahealy77's knock in the chase for @UPWarriorz was packed with timing & elegance 👌🏻👌🏻Watch her innings here 🎥🔽 #TATAWPL | #RCBvUPW https://t.co/lTEnR2xCCM pic.twitter.com/Z7vpAdKtnO
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 10, 2023
गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी
एलिसा हिलीने या सामन्यात 47 चेंडूंचा सामना करताना 18 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 96 धावा चोपल्या. तिला यावेळी शतक करता आले नाही. मात्र, तिने विजयी झुंज दिली. तिची ही स्पर्धेतील सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे. तिला विजय मिळवण्यात देविका वैद्यने साथ दिली. तिनेही 31 चेंडूंचा सामना करत नाबाद 36 धावा केल्या. दोघींमध्ये 13 षटकात 139 धावांची विजयी भागीदारी झाली. या पराभवामुळे आरसीबी गुणतालिकेत पाचव्या म्हणजेच शेवटच्या स्थानावर कायम आहे. तसेच, मुंबई इंडियन्स पहिल्या, तर यूपी संघ तिसऱ्या स्थानी आहे. (wpl 2023 rcbwvupw UP Warriorz becomes the first team to win a WPL match by 10 wickets)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हिलीच्या ‘कॅप्टन्स इनिंग’ने युपीचा 10 विकेट्सने विजय! आरसीबीची सलग चौथी हार
हीच ती वेळ! खराब फॉर्ममधून चाललेल्या विराटबाबत दिग्गजाचे लक्षवेधी वक्तव्य