दिल्ली कॅपिटल्स संघाची कर्णधार मेग लॅनिंग हिने डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्याची नाणेफेक जिंकील. नाणेफेक गमावल्यानंतर स्मृती मंधाना हिच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ प्रथम गोलंदाजी करताना दिसणार आहे. दिल्ली स्थित अरुण जेटली स्टेडियमवर डब्ल्यूटीएलचा हा अंतिम सामना आयोजित केला गेला आहे.
आरसीबीसाठी फ्रँचायझीने याआधी टी-20 लीगच्या अंतिम सामन्यात जेव्हा कधी प्रथम गोलंदाजी केली, तेव्हा त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. 2009, 2011, 2016 आणि 2024 या साली आरसीबीने आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रथम गोलंदाजी केली होती आणि सामन्यात पराभव देखील स्वीकारला होता. पण स्मृती मंधानाच्या नेतृत्वातील आरसीबीने डब्ल्यूटीसीमध्ये पहिल्यांदाच अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली आहे. याही सामन्यात त्यांना प्रथम गोलंदाजी करावी लागत आहे. अशात सामन्याचा निकाल काय असणार, हे पाहणे रोमांचक ठरेल.
DELHI CAPITALS HAVE WON THE TOSS AND THEY’VE DECIDED TO BAT FIRST. pic.twitter.com/KnTkvfkvo9
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 17, 2024
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, एस मेघना, एलिस पेरी, दिशा कासट, रिचा घोष (यष्टीरक्षक), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, शोभना आशा, रेणुका सिंग.
दिल्ली कॅपिटल्स: मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, राधा यादव, मिन्नू मणी, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), शिखा पांडे.
(Delhi Capitals have won the toss and opted to bat first)
महत्वाच्या बातम्या –
असं केलं तर सॅमसन टी-20 विश्वचषक खेळणार! माजी क्रिकेटपटूकडून मिळाला सल्ला
पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी शेन वॉटसनचा नकार, समोर आले मोठे कारण