महिला प्रीमियर लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. तसेच हा अंतिम सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात हा सामना रंगणार असून वुमन्स प्रीमियर लीगच्या इतिहासात नव्या विजेत्याची भर पडणार आहे. याबरोबरच गेल्या वर्षीच्या तुलनेत या स्पर्धेकडे क्रीडारसिकांची ओढ जास्त असलेली पहायला मिळाली आहे.
अशातच वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु चार वेळा आमनेसामने आले आहेत. चारही सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली आहे. त्यामुळे अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सचं पारडं जड आहे. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या काही खेळाडूंचा फॉर्म पाहता सामना वाटतो तितका सोपा जाणार नाही. त्यामुळे अंतिम सामना हा रंगतदार होण्याची दाट शक्यता आहे.
याबरोबरच, आरसीबीकडून चाहत्यांना मोठ्या आशा आहेत की हा संघ पहिल्यांदाच हे विजेतेपद पटकावणार आहे. कारण आयपीएलच्या इतिहासात आजपर्यंत आरसीबी संघाला विजेतेपद मिळवता आलेले नाही, त्यामुळे चाहत्यांना आरसीबीकडून डब्ल्यूपीएलमध्ये आशा आहेत. मात्र, आरसीबीसाठी हे तितके सोपे असणार नाही. तर अंतिम सामन्यात मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली आरसीबीचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने सलग दुसऱ्यांदा WPL च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या वेळी दिल्लीला मुंबई इंडियन्सकडून फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.
The Captains are 𝗥𝗘𝗔𝗗𝗬 for the summit clash 🏆
ARE. YOU❓ #TATAWPL | #DCvRCB | #Final | @DelhiCapitals | @RCBTweets | @mandhana_smriti pic.twitter.com/Na4UY55Sy4
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 16, 2024
दरम्यान, महिला प्रीमियर लीग 2024 मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एलिस पेरीची चमकदार कामगिरी पाहिली आहे, तर दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगने देखील तिच्या अप्रतिम फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. या दोन्ही खेळाडूंनी आपापल्या संघांना अंतिम फेरीत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या मोसमात आत्तापर्यंत ॲलिस पॅरीने 312 धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने या हंगामात 500 हून अधिक धावा केल्या आहेत. लॅनिंगने दिल्लीसाठी प्रत्येक सामन्यात महत्त्वाची खेळी खेळली आणि आपल्या संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यामुळे दोन्हीं खेळाडूंनकडून अंतिम सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
- संजना होरोचे 5 गोल; तेलंगणा हॉकीच 11-0 असा धुव्वा उडवत हॉकी बंगाल उपांत्यपूर्व फेरीत
- शिअरफोर्स आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीगमध्ये भारती विद्यापीठचा शानदार विजय