वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चुरस आता रंगतदार वळणार आली आहे. युपी वॉरियर्स आणि आरसीबी यापैकी कोणाला तिकीट मिळतं याची उत्सुकता वाढली आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स संघ पात्र ठरले असून तिसऱ्या संघात जर तरच गणित पहायला मिळत आहे. तसेच तिसऱ्या संघासाठी युपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. या दोन्ही संघांचा स्पर्धेतील शेवटचा सामना उरला आहे. त्यामुळे दोन्ही संघांचं एकमेकांवर अवलंबून आहे. त्यामुळे यापैकी कोण टॉप ३ मध्ये एन्ट्री मारतो यांची उत्सुकता लागून राहिली आहे.
याबरोबरच गुजराज जायंट्स आणि युपी वॉरियर्स यांच्यात आज सामना होत आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी महत्त्वाचा आहे. हा सामना गुजरातने जिंकला तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा प्रवास अधिक सोपा होणार आहे. तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असून बंगळुरुने 7 सामन्यात 3 विजय आणि 4 पराभवांसह एकूण 6 गुण आहेत. याबरोबरच यूपी वॉरियर्सचेही असून 6 गुण आहेत. पण बंगळुरूचा निव्वळ रन रेट +0.027 आहे. त्यामुळे तो यूपी वॉरियर्सच्या एका स्थानाने वरती आहे.
अशातच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला प्लेऑफचा खेळण्यासाठी त्यांना 12 मार्च रोजी होणारा मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना कोणत्याही परिस्थित जिंकावा लागणार आहे. यामुळे ते तिसऱ्या स्थानावर राहील आणि प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करेल, परंतु बेंगळुरूला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी यूपी वॉरियर्सला गुजरात जायंट्सविरुद्धचा शेवटचा सामना गमवावा लागणार आहे.
दरम्यान, असं असताना टॉप 3 मध्ये क्वॉलिफाय झालेल्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. कारण अव्वल स्थान गाठण्यासाठी या दोन्ही संघांची धडपड असणार आहे. दोन्ही संघांचे साखळी फेरीत प्रत्येकी एक सामना शिल्लक आहे. त्यामुळे हा सामना जिंकण्यासोबत रनरेट कायम ठेवण्याचं आव्हान आहे. कारण अव्वल स्थानी असलेला संघ थेट अंतिम फेरी खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- मराठमोळ्या क्रिकेटपटूच्या 17 वर्षांच्या कारकिर्दीला अखेर विराम, मैदानावर ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन सन्मान
- धमाकेदार कसोटी प्रदर्शनानंतर जयस्वालच्या वनडे पदार्पणाची मागणी, दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया