---Advertisement---

WPL 2024 चे आयोजन फक्त एकाच राज्यात केले जाणार; जय शाह म्हणाले, ‘आमच्याकडे उत्तर प्रदेशसह…’

Jay Shah And WPL
---Advertisement---

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी शनिवारी जाहीर केले की, महिला प्रीमियर लीग 2024 काही कारणांमुळे केवळ एकाच राज्यात खेळवली जाईल आणि फेब्रुवारीपासून सुरू होईल. शहा पत्रकरांशी बोलताना म्हणाले, “स्पर्धा फेब्रुवारीमध्ये सुरू होईल आणि आम्ही ती एकाच राज्यात आयोजित करू. आमच्यासाठी यावेळी लॉजिस्टिक खूप महत्त्वाची आहे. ते पुढे असेही म्हणाले की, आयपीएल मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल आणि मेच्या शेवटी संपेल.”

मात्र, डब्ल्यूपीएल कोणत्या राज्यात होणार हे त्यांनी उघड केले नाही. जय शाह (jay Shah) म्हणाले, “आमच्याकडे बेंगलोर आणि उत्तर प्रदेशसह अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे आम्ही सामने आयोजित करू शकतो. काही वर्षांनंतर, आम्ही गुजरातमधील अहमदाबाद, राजकोट आणि वडोदरा येथे देखील ते करू शकतो. आम्ही फ्रेंचायझी मालकांशी याबद्दल चर्चा करू, आणि नंतर निर्णय घेऊ. हा मुळात फ्रँचायझी आणि बीसीसीआयचा संयुक्त कॉल आहे. आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ.”

देशांतर्गत हंगामातील सामन्यांना अडचण येणार नाही, हे लक्षात घेऊन स्थळ निवडले जाईल, असेही बीसीसीआय सचिवांनी सांगितले. ते म्हणाले, “स्टेडियम कुठे उपलब्ध असेल ते आम्ही पाहू. गुजरात, चंदीगड आणि रांची येथे देशांतर्गत सामने सुरू आहेत. असे नाही की आम्हाला डब्ल्यूपीएलचे सामने फक्त मुंबईतच करायचे आहेत. डब्ल्यूपीएलचा पुढील हंगाम आणखी यशस्वी होईल, अशी आशा शहा यांनी व्यक्त केली.”

फ्रँचायझी अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात खर्च करतात, हे त्यांच्यावरील आत्मविश्वास दर्शवते. गुजरात जायंट्सने या लिलावात पंजाबची वेगवान गोलंदाज काशवी गौतम हीला 2 कोटी रुपयांना आपल्या संघात समाविष्ट केले. अशाप्रकारे काशवी ही भारताचा सर्वात महाग विकली जाणारी ‘अनकॅप्ड’ खेळाडू ठरली, तर लिलावाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन खेळाडूंना खूप मागणी होती. काशवीची बेस प्राईज 10 लाख रुपये होती. गुजरात आणि यूपी वॉरियर्सने तिच्यासाठी बोली लावली. परंति बोली जिंकण्यात गुजरात संघ यशस्वी ठरला. (WPL 2024 will be hosted in only one state Jai Shah saidmWe have Uttar Pradesh)

महत्वाच्या बातम्या

‘IPLने Impact Player Rule रद्द करावा, भारतीय फलंदाज…’, माजी दिग्गजाने का दिला असा सल्ला? घ्या जाणून
LLC 2023 । मणिपाल टायगर्सने पहिल्यांदा जिंकली ट्रॉफी, हरभजनकडून रैनाच्या संघाला फायनलमध्ये मात

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---