महिला प्रीमियर लीग 2026 (WPL 2026) चा महत्त्वाचा खिताबी सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जात आहे. महिला आयपीएलचा हा चौथा हंगाम असून, दिल्ली कॅपिटल्सने सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मागील तीन फायनलमध्ये दिल्लीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, पण यंदा संघ पहिल्या ट्रॉफीसाठी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरला आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. दुसरीकडे, बंगळुरू संघ दुसरा WPL किताब जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. 2023-24 हंगामात त्यांनी पहिल्यांदा WPL ट्रॉफी जिंकली होती आणि यंदा त्यांचा संघ पुन्हा इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे.
लीग स्टेजमध्ये 8 पैकी 4 सामने जिंकून दिल्लीने प्लेऑफसाठी स्थान मिळवले. एलिमिनेटरमध्ये गुजरात टायटन्सचा 7 गडी राखून पराभव करत त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. सुरुवातीला सलग दोन पराभव, नंतर विजय, पुन्हा पराभव आणि अखेरच्या सामन्यात विजय मिळवत संघाने प्लेऑफसाठी मार्ग मोकळा केला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लीग टप्प्यात 6 सामने जिंकून अव्वल स्थान मिळवले आणि थेट फायनलमध्ये स्थान मिळवले. दिल्ली आणि मुंबईविरुद्ध दोन्ही सामन्यांत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले, पण लीगमधील कामगिरीच संघाची ताकद दाखवते.
दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-
दिल्ली कॅपिटल्स: लिझेल ली (यष्टीरक्षक), शेफाली वर्मा, लॉरा वोलवार्ड्ट, जेमिमा रोड्रिग्स (कर्णधार), मरिझान कॅप, शिनेल हेन्री, निकी प्रसाद, स्नेह राणा,मिन्नू मणी, श्री चारणी, नंदिनी शर्मा
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: ग्रेेस हॅरिस, स्मृती मानधना (कर्णधार), जॉर्जिया वॉल, रिचा घोष (यष्टीरक्षक), राधा यादव, नॅडीन डी क्लर्क, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, सायली साठगरे, श्रेयांका पाटील, लॉरेन बेल






