---Advertisement---

WPL ने बदलले नशीब! ‘या’ 5 खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी करत गाठली भारतीय टीम, तर एकीने जिंकून दिला वर्ल्ड कप

On: रविवार, जानेवारी 4, 2026 7:13 PM
Shreyanka Patil
---Advertisement---

महिला प्रीमियर लीगचे आतापर्यंत 3 हंगाम झाले आहेत. 2023 मध्ये मुंबई इंडियन्सने, 2024 मध्ये आरसीबीने आणि 2025 मध्ये पुन्हा मुंबई इंडियन्सने विजेतेपद पटकावले. या लीगमुळे अनेक खेळाडूंना टीम इंडियाचे दरवाजे उघडले गेले आहेत.

श्री चरणी (Shri Charani):
आंध्र प्रदेशच्या श्री चरणीने 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळताना 2 सामन्यात 4 विकेट्स घेतल्या. या कामगिरीमुळे तिला भारतीय संघात स्थान मिळाले. तिने आतापर्यंत 18 वनडेत 23 आणि 10 टी-20 सामन्यात 15 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, भारताला महिला वनडे वर्ल्ड कप जिंकून देण्यात तिने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

श्रेयंका पाटिल (Shreyanka Patil):
आरसीबीकडून 2023 मध्ये खेळताना श्रेयंकाने 7 सामन्यात 6 विकेट्स घेतल्या. त्यानंतर काही काळातच तिला भारतीय संघात संधी मिळाली. आतापर्यंत तिने 3 वनडे आणि 16 टी-20 सामन्यात एकूण 25 विकेट्स घेतल्या आहेत.

सजीवन सजना (Sajeevan Sajana)
2024 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना सजनाने पहिल्याच सामन्यात षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला आणि ती प्रकाशझोतात आली. तिने आतापर्यंत भारतासाठी 14 टी-20 सामने खेळले असून त्यात 41 धावा आणि 1 विकेट घेतली आहे.

मीन्नू मणि (Minnu Mani):
केरळच्या मीन्नू मणिने 2023 मध्ये दिल्लीसाठी 3 सामने खेळले. जरी तिला त्यात विकेट मिळाली नव्हती, तरी तिच्या प्रभावी गोलंदाजीमुळे तिला टीम इंडियात पदार्पण करण्याची संधी मिळाली.

आशा सोभना (Asha Sobhana):
2024 मध्ये आरसीबीसाठी 10 सामन्यात 12 विकेट्स घेत आशा सोभना हिने सर्वांचे लक्ष वेधले. त्यानंतर तिची भारतीय संघात निवड झाली. आतापर्यंत तिने 2 वनडे आणि 6 टी-20 सामन्यात 13 विकेट्स घेतल्या आहेत.

सायका इशाक (Saika Ishaque)
मुंबई इंडियन्सने 2023 मध्ये सायका इशाकला फक्त 10 लाखांत खरेदी केले होते. तिने 10 सामन्यात 15 विकेट्स घेत आपली किंमत सिद्ध केली. त्यानंतर तिने इंग्लंडविरुद्ध टी-20 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे पदार्पण केले. आतापर्यंत तिने भारतासाठी 4 सामन्यात 5 विकेट्स घेतल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---