भारतासाठी कुस्तीतून आनंदाची बातमी येत आहे. टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये शुक्रवारी (६ ऑगस्ट) पुरुषांच्या फ्रीस्टाईल ६५ किलो वजनी गटाच्या सामन्यात भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने किर्गिस्तानच्या एर्नाझार अकमातलीवला तांत्रिक गुणांच्या आधारे पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.
बजरंगने पहिला राऊंड ३-१ ने आपल्या नावावर केला होता. त्यानंतर दुसऱ्या राऊंडमध्ये बजरंगने एर्नाझारचा पाय पकडून आपला दाव लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसरा पाय त्याला पकडता आला नाही. (Wrestler Bajrang Punia wins against Kyrgyzstan’s E Akmataliev in Men’s 65kg Freestyle 1/8 final match, enters quarterfinals)
#TeamIndia | #Tokyo2020 | #Wrestling
Men's Freestyle 65kg 1/8 Finals Results#BajrangPunia wins his debut #Olympics bout against Ernazer Akmataliev and moves to 1/4 Finals. #AllTheBest @BajrangPunia👍 #RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/dBAWT92SHt— Team India (@WeAreTeamIndia) August 6, 2021
शेवटच्या ३० सेकंदातही दुसऱ्या राऊंडमध्ये बजरंग पुढे होता. मात्र, एर्नाझारने अचानक आक्रमक खेळ करत दोन वेळा १-१ गुण मिळवले. शेवटी बजरंगला एकदम जास्त गुण मिळवल्यामुळे तांत्रिक आधारे विजयी घोषित करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या-
-दिपक पुनियाच्या हातून निसटले ‘कांस्य’, रोमांचक सामन्यात झाला पराभूत
-टोकियो ऑलिंपिकमधील रवी दहियाच्या सोनेरी कामगिरीचा ग्रामस्थांकडून जल्लोष, गावभर केला दीपोत्सव