टोकियो ऑलिम्पिकमध्ये शनिवारी (७ ऑगस्ट) भारताचे कुस्तीतील आव्हान संपले. ऑलम्पिकमध्ये शिल्लक असलेला भारताचा अखेरचा कुस्तीपटू बजरंग पूनिया याने ६५ किलोग्राम फ्रीस्टाइल गटात कांस्य पदकासाठी झालेला रेपचेज सामना ८-० अशा फरकाने जिंकत कांस्य पदक आपल्या नावे केले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये दुसरे पदक जिंकणारा तो कुस्तीगीर ठरला.
असा रंगला सामना
उपांत्य फेरीत पराभूत झाला असला तरी बजरंगला रेपचेज राउंडमध्ये कांस्य पदकासाठी लढण्याची संधी मिळाली. कझाकस्तानच्या दौलेत नियाझबेकोव याच्याविरूद्ध झालेल्या या सामन्यात पॅसिविटीचा एक व विरोधी कुस्तीपटूला बाहेर काढण्याचा एक असे दोन गुण मिळवत पहिल्या हाफमध्ये चांगली सुरुवात केली.
तीन मिनिटांच्या दुसरा हाफमध्ये दोन गुणांचा डाव टाकत आघाडी वाढवली. पुन्हा एक टेक डाऊन करत त्याने दोन गुणांची कमाई केली. अखेरीस पुन्हा एकदा टेकडाऊन करत ८-० अशी आघाडी घेत सामना आपल्या नावे केला.
#TeamIndia | #Tokyo2020 | #Wrestling
Men's Freestyle 65kg Bronze Medal ResultsBronze laden @BajrangPunia🥉
Bajrang Punia beats reigning World Silver medalist Daulet Niyazbekov 8-0 winning #TeamIndia its 6th @Tokyo2020 medal! #RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/yr4nHJAT9Q— Team India (@WeAreTeamIndia) August 7, 2021
उपांत्य फेरीत झाला होता पराभूत
शुक्रवारी (६ ऑगस्ट) बजरंग उपांत्य फेरीत पराभूत झालेला. बजरंगचा सामना अजरबैजानच्या हाजी अलियेव्हसोबत झाला होता. जागतिक विजेता कुस्तीपटू असलेल्या हाजीने बजरंगला या सामन्यात १२-५ अशा फरकाने सहजरीत्या पराभूत केले. त्यानंतर कुस्तीच्या नियमानुसार त्याला रेपचेज राउंडमध्ये खेळण्याची संधी मिळाली.
ऑलम्पिक पदक पटकावणारा सातवा भारतीय कुस्तीपटू
बजरंग ऑलिम्पिक पदक पटकावणारा सातवा भारतीय कुस्तीपटू ठरला. भारतासाठी कुस्तीतील पहिले ऑलिम्पिक पदक खाशाबा जाधव यांनी १९५२ हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाच्या रूपाने पटकावले होते. त्यानंतर २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य व २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकण्याची कामगिरी सुशील कुमार याने केलेली.
लंडन ऑलिम्पिकमध्येच योगेश्वर दत्त यानेदेखील कांस्य पदक मिळवले होते. २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने कांस्य पदक जिंकून इतिहास रचला होता. दोन दिवसांपूर्वीच रवी कुमार याने ५७ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकून टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे कुस्तीतील पहिले पदक कमावले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
ऐतिहासिक सामन्यासाठी नीरज करतोय ‘अशी’ तयारी, व्हिडिओ झाला व्हायरल
ऑसी गोलंदाजाने टी२० पदार्पणातच केला हॅट्रिकचा कारनामा, तरीही संघ बांगलादेशविरुद्ध पराभूत
रेकॉर्ड अलर्ट! शमी आणि बुमराहकडे आज तीन भारतीय दिग्गजांना मागे टाकण्याची संधी