कुस्ती म्हटलं की विजय चौधरी (wrestler Vijay Chaudhary) हे नाव महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींना आठवतच. त्यांच्या नावाशिवाय कुस्तीची चर्चा पूर्ण होत नाही. ‘ट्रिपल महाराष्ट्र केसरी’ विजय चौधरी यांना आजपर्यंत अनेकदा कुस्तीचे आखाडे गाजवले, पण त्यांना कुस्तीचे सुरुवातीचे धडे दिले ते, त्यांचे वडील नथ्थू भिका चौधरी यांनी. याबद्दल नुकतेच विजय चौधरी यांनीच एक व्हिडिओ शेअर करत खुलासा केला आहे. नथ्थू भिका चौधरी हे देखील नावाजलेले कुस्तीपटू आहेत.
नुकतेच फेसबुकवर विजय चौधरी यांनी त्यांच्या वडिलांबरोबर कुस्ती खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘साप्ताहिक सुट्टीत गावी गेलो की, वडिलांसोबत तालमीत प्रॅक्टिस करण्याची मजा व तो आनंद वेगळाच असतो. कुस्तीक्षेत्रातील माझे पहिले गुरू व वस्ताद म्हणजे माझे वडील #आण्णा.’
तसेच या व्हिडिओमध्ये दिसते की, विजय चौधरी आणि त्यांचे वडील एकमेकांशी दोन हात करताना दिसत आहेत. या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळाली असून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच अनेकांनी त्यांचे वडील अजूनही चांगली कुस्ती खेळत असल्याचे म्हणले आहे.
https://www.facebook.com/wrestlerTMK141516/videos/353401183359571/?extid=NS-UNK-UNK-UNK-IOS_GK0T-GK1C&ref=sharing
विजय चौधरी हे सध्या पोलीस उपअधीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांची २०१७ साली महाराष्ट्र शासनाने पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती केली. विजय चौधरी यांनी २०१४, २०१५ आणि २०१६ साली मानाचा ‘महाराष्ट्र केसरी‘ किताब पटकावला आहे. विजय हे जळगाव जिल्ह्यातील सायगावचे असून त्यांचे सध्या वय ३३ वर्षे आहे.
विजय पुण्यातील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल आणि पंजाबमधील धूमछडी आखाडा येथे हिंदकेसरी रोहित पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. पुण्यात ते ज्ञानेश्वर मांगडे आणि महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात.
महत्त्वाच्या बातम्या –
तब्बल १४ हंगामात खोऱ्याने पैसा ओढला, १५व्या मोसमातही नोंदवलंय नाव! तो एकलाची एक ‘असा’ परदेशी खेळाडू
धक्कादायक! पिंपरी चिंचवडवडमधील पैलवानाचा अंदाधुंद गोळीबारात मृत्यू, धडाधड झाडल्या ८ गोळ्या
Video: ‘द ग्रेट’ खलीने फुटबॉलने खेळले क्रिकेट; चाहते म्हणाले, ‘आभाळाला छिद्र पडेल’