दिल्लीच्या जंतरमंतर येथे 27 व्या दिवशीही कुस्तीपटूंची निदर्शने सुरूच आहे. त्याच वेळी, हरियाणाच्या खाप पंचायतींनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमला केवळ 2 दिवस बाकी आहेत. मात्र अद्याप खासदार व भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांना अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, ब्रिजभूषण सिंह यांनी एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत पदके परत करण्याच्या खेळाडूंच्या धमकीवर भाष्य केले.
सिंग यांना एका मुलाखतीत खेळाडू देत असलेल्या धमकी बाबत विचारले गेले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, “जे पैसे फेडरेशन, सरकार आणि जनतेने खेळाडूंना दिले आहेत. त्याची किंमत काही कोटी रुपये आहे. खेळाडूंनी ते परत करावे. अशा मेडलची किंमत पंधरा रुपये आहे. खेळामुळे त्याला सरकारी नोकरीही मिळाली आहे.”
ये मेडल सालों की मेहनत और करोड़ों देशवासियों की दुआओं की वजह से आया है।जब हम मैदान में उतरते हैं तो देशवासी काम छोड़कर हमारे लिए प्रार्थना करते हैं।हमारे गले में मेडल डलता है तो हर देशवासी का सीना चौड़ा होता है।ये मेरे भारत देश का मेडल है, इसकी क़ीमत कोई क्या लगाएगा भाई ! 🇮🇳 pic.twitter.com/pnbrHd2XrE
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) May 19, 2023
सिंग यांच्या या वक्तव्यानंतर उपोषण करत असलेल्या खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. ऑलिंपिक पदक विजेता बजरंग पुनिया याने ट्विट करत लिहिले,
‘हे पदक वर्षानुवर्षे केलेल्या मेहनतीमुळे आणि करोडो देशवासीयांच्या आशीर्वादामुळे मिळाले आहे. जेव्हा आपण मैदानात उतरतो तेव्हा देशवासीय काम सोडून आपल्यासाठी प्रार्थना करतात. आपल्या गळ्यात पदक घातल्यावर प्रत्येक देशवासीयाची छाती फुलते. हा माझा भारत आहे. हे देशाचे पदक आहे, त्याची काय किंमत असेल?’
भारतीय कुस्तीपटू २३ एप्रिलपासून दिल्लीतील जंतरमंतरवर उपोषण करत आहेत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपले उपोषण सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुस्तीपटूंच्या वतीने सर्वोच्च न्यायालयातही अपील करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिल्ली पोलिसांनी सिंग यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे. या खेळाडूंनी सिंग यांच्यावर लैंगिक शोषण व भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
(Wrestlers Protest Brijbhushan Singh Said Medals Price Just 15 Rupees Take Back Money)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शतकानंतर विराट कोहली ऑस्ट्रलियन गोलंदाजांच्या निशाण्यावर! डब्ल्यूटीसी फायनलआधी स्वतः रिकी पाँटिंगचा खुलासा
फाफ डू प्लेसिस विश्वचषकात खेळलाच पाहिजे! भारतीय दिग्गजाचा दक्षिण आफ्रिका बोर्डाला सल्ला