भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांची एसआयटी चौकशी सुरू आहे. यादरम्यान अनेक नवनवे खुलासे होत आहेत. आतापर्यंत एसआयटीने 200हून अधिक व्यक्तींना प्रश्न विचारले. यामध्ये आंतरराष्ट्रीय पंच जगबीर सिंग यांनी माध्यमांशी बोलताना धक्कादायक खुलासा केला. त्यांनी म्हटले की, बृजभूषण यांनी नशेच्या स्थितीत महिला कुस्तीपटूंशी गैरवर्तन केला होता.
आंतरराष्ट्रीय पंच जगबीर सिंग (Jagbir Singh) हे बृजभूषण शरण सिंग (Brijbhushan Sharan Singh) यांच्याविरुद्ध लैंगिक अत्या’चाराच्या प्रकरणात साक्षीदार आहेत. त्यांनी सांगितले की, 20 मे, 2023 रोजी दिल्ली पोलिसांचे पथक पटियालातील त्यांच्या घरी गेले होते, जिथे त्यांचा जबाब नोंदवण्यात आला होता.
आशिया अजिंक्यपद 2022 स्पर्धेच्या चाचणीदरम्यान घडली घटना
जगबीर सिंग यांनी पुढे सांगितले की, पोलिसांनी एक फोटो दाखवून माहिती मागितली होती. तो फोटो 25 मार्च, 2022च्या आशिया अजिंक्यपद स्पर्धेच्या चाचणीदरम्यान घेतला गेला होता. त्यांनी दावा केला की, त्यावेळी बृजभूषण यांनी एका महिला कुस्तीपटूसोबत गैरवर्तन केले होते.
काय काय म्हणाले जगबीर सिंग?
“मी फार काही बोलू शकलो नाही. कारण, मुलींनी तक्रार नोंदवल्याशिवाय मी काहीच करू शकत नव्हतो. मात्र, मी हे सर्व माझ्या डोळ्यांनी पाहिले आणि मला वाईट वाटले.” 2007 पासून प्रशिक्षक सह आंतरराष्ट्रीय पंच म्हणून काम करणारे जगबीर म्हणाले की, त्यांनी बृजभूषण सिंग यांचे गैरवर्तन डोळ्यांनी पाहिले आहे.
“सन 2013मध्ये कझाकस्तानच्या दुसऱ्या दौऱ्यात ते अध्यक्ष झाल्यानं, त्यांनी ‘मी तुम्हाला आज भारतीय जेवण खायला देईल,’ असे सांगितले. तसेच, ज्युनिअर कुस्तीपटूंच्या हॉटेलमध्ये एका पार्टीचे आयोजन केले होते,” असा दावा त्यांनी केला.
त्यांनी असेही सांगितले की, 2013मध्ये त्यांनी पहिल्यांदा अध्यक्षांना महिला खेळाडूंसोबत गैरवर्तन करताना पाहिले होते. तो थायलंड दौरा होता, जिथे त्यांनी बृजभूषण यांना महिलांच्या मागे उभे असल्याचे पाहिले. त्यांनी महिला खेळाडूंना चुकीचा स्पर्श केला होता.
‘ते दोन ते तीन मुली त्यांच्यासोबत असायच्या’
पुढे बोलताना ते म्हणाले की, “थायलंडमधील बृजभूषण आणि त्यांचे सहकारी दारुच्या नशेत होते आणि त्यांनी मुलींशी गैरवर्तन केले होते. याचा मी साक्षीदार आहे. 2022मध्ये मी काहीतरी पाहिले. अध्यक्ष जेव्हाही राष्ट्रीय स्पर्धांसाठी देशांतर्गत फिरायचे, तेव्हा दोन ते तीन मुली त्यांच्यासोबत असायच्या, परंतु आम्ही कधीच विरोध करू शकलो नाही. आम्ही ते आमच्या डोळ्यांनी पाहिले आहे.”
याव्यतिरिक्त त्यांनी असाही दावा केला की, बृजभूषण सिंग यांनी 2022मध्येही बुल्गेरियात असे कृत्य केले होते. आता या प्रकरणात आणखी काय धक्कादायक खुलासे होतात, ते पाहणे महत्त्वाचे ठरेल. (wrestlers protest international referee jagbir singh shocking revelation brij bhushan sharan singh sexual harassments)
महत्वाच्या बातम्या-
‘न्यायाच्या वाटेत नोकरी आली, तर 10 सेकंदात…’, दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनियाचे रोखठोक वक्तव्य
देशासाठी रक्त सांडून मिळवलेले मेडल गंगेत वाहणार कुस्तीपटू, न्यायासाठी मरण्याचीही तयारी