देशात सध्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाची एकच चर्चा रंगली आहे. कुस्तीपटूंचे भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्धचे आंदोलन सुरू होते. मंगळवारी (दि. 30 मे) कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, आणि विनेश फोगाट यांनी त्यांची पदके गंगा नदीत वाहण्याचा निर्णय घेतला. ते हरिद्वार येथे पोहोचले खरे, पण शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी मनवल्यानंतर ते परतले. टिकैत यांनी कुस्तीपटूंकडून पाच दिवसाची मुदत मागितली आहे.
बृजभूषण यांचे भाष्य
दुसरीकडे, बृजभूषण शरण सिंग (Brijbhushan Sharan Singh) यांनी मंगळवारी रात्री उशिरा माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी कुस्तीपटूंकडून सुरू असलेल्या चौकशीवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, “पुढे पाहा काय होतंय. चौकशी तरी करू द्या, आता तर आमच्या हातातही काही नाहीये. आता प्रकरण दिल्ली पोलिसांच्या हातात आहे.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “कुस्तीपटूंच्या निवेदनामुळेच एफआयआर दाखल झाली आहे. आता तपास सुरू आहे. आता त्यात आम्ही त्यांची काय मदत करू शकतो. आज त्यांनी पदके गंगेत वाहण्याऐवजी टिकैत यांना दिली, तर तो त्यांचा निर्णय आहे. आम्ही यात काय करू शकतो.”
राजीनामा देण्याच्या प्रश्नावर बृजभूषण म्हणाले की, “माझा तर कार्यकाळही पूर्ण झाला आहे. जर मी चुकीचा सापडलो, तर अटक होईल. यात समस्या कसली आहे.”
हरिद्वारमध्ये रडताना दिसले कुस्तीपटू
कुस्तीपटू लैंगिक अत्याचाराच्या आरोपांविषयी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध सातत्याने आंदोलन करत आहेत. जेव्हा कुस्तीपटू हरिद्वार येथे पोहोचले, तेव्हा साक्षी मलिक (Sakshi Malik) हिने पदक आणि प्रमाणपत्र आपल्या छातीच्या जवळ घट्ट पकडले होते. बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट हेदेखील तिथे पोहोचले. यावेळी सर्वजण रडताना दिसले.
कुस्तीपटूंनी मंगळवारी दुपारी आपली पदके गंगेत वाहण्याची घोषणा केली होती. ते म्हणाले होते की, आता कुस्तीपटू इंडिया गेटवर आंदोलन करणार. जंतर-मंतरवर 23 एप्रिलपासून आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी 28 मे रोजी संसदेच्या नवीन इमारतीसमोर महिला महापंचायतीची घोषणा केली होती. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. यानंतर कुस्तीपटू जंतर-मंतरवर परतले होते. (wrestlers protest jantar mantar brij bhushan sharan singh on the allegations of wrestlers read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कुस्तीपटूंविरुद्धच्या पोलीस कारवाईवर अनिल कुंबळेची सर्वात मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘हातापाई…’
‘लाज वाटते तू भारतरत्न असल्याची’, कुस्तीपटूंच्या आंदोलनप्रकरणी निखिल वागळेंची सचिनवर जहरी टीका