ऑलिम्पिक, राष्ट्रकुल यांसारख्या स्पर्धांमध्ये सुवर्ण कामगिरी करून भारतासाठी पदके जिंकणारे कुस्तीपटू त्रास सहन करत आहेत. जवळपास मागील 3 महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंच्या मागण्या पूर्ण होत नाहीयेत. अशात दिल्लीच्या जंतर-मंतर येथे आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये बुधवारी (दि. 3 मे) रात्री हातापायी झाली. यावेळी काही कुस्तीपटूंना दुखापतही झाली. यानंतर विनेश फोगाट आणि साक्षी मलिक या पदकविजेत्या कुस्तीपटूंना अश्रू अनावर झाल्या. विनेश दिल्ली पोलिसांसोबत झालेल्या वादानंतर रडली.
रात्री माध्यमांशी बोलताना विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिने भाष्य केले. ती म्हणाली की, “जेव्हा आम्ही देशासाठी पदक जिंकले होते, तेव्हा कधीच विचार केला नव्हता की, एक दिवस आम्हालाही हा दिवस पाहावा लागेल. मी तर म्हणेल की, देशातील कोणत्याही खेळाडूने देशासाठी पदक जिंकलाच नाही पाहिजे.”
‘आम्ही आमची पदके भारत सरकारला परत करू’
बजरंग पुनिया (Bajrang Punia) म्हणाला की, “आम्ही आमची पदके भारत सरकारला परत करू.” बॉक्सर विजेंद्र सिंग म्हणाला की, “आता हा लढा दीर्घ काळ चालेल.” आंदोलनासाठी बसलेली आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट दिल्ली पोलिसांवर आरोप करत म्हणाली की, “नशेत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने आमच्यासोबत गैरवर्तन केले. आम्ही आमच्या मान-सन्मानाचा लढा लढत आहोत आणि त्या लढ्याचे फलित म्हणजे इथे पोलिसाने आम्हाला छातीवरून ढकलले.”
रात्री झाली भांडणं
खरं तर, जंतर-मंतर (Jantar-Mantar) येथे भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग (President of Wrestling Federation of India Brijbhushan Singh) यांच्या अटकेच्या मागणीसाठी साक्षी मलिक, बजरंग पुनिया, विनेश फोगाटसह अनेक स्टार कुस्तीपटू मागील काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. रात्री उशिरा बेडविषयी पोलिसांसोबत त्यांचे भांडण झाले. कुस्तीपटू म्हणाले की, पावसामुळे रस्ता ओला झाला होता. जेव्हा आंदोलनाच्या ठिकाणी बेड घेऊन आलो, तेव्हा पोलिसांनी अडवले. नशेत असलेल्या पोलिसांनीन मारामारी केली आणि अपशब्दाचा वापर केला. कुस्तीपटू म्हणत होते की, पोलिसांनी काठ्यांनी मारहाण केली.
पोलीस काय म्हणाले?
पोलीस उपायुक्त प्रणव तायल म्हणाले की, “रात्री उशिरा जंतर-मंतरवर आम आदमी पार्टीचे नेते सोमनाथ भारती परवानगीशिवाय बेड घेऊन पोहोचले. आम्ही मध्यस्थी केली, तेव्हा कुस्तीपटूंचे समर्थक आक्रमक झाले आणि ट्रकमधून बेड काढण्याचा प्रयत्न करू लागले. यानंतर एक सामान्य वाद झाला.”
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल घटनास्थळी पोहोचल्या. त्या म्हणाल्या की, “मी पुन्हा एकदा मुलींना (कुस्तीपटूंना) भेटायला आले आहे. कारण, हे माझं कर्तव्य आहे. कुस्तीपटू विनेश फोगाट आणि साक्षी मलिकने मला सांगितले आहे की, त्यांना त्रास दिला जात होते आणि तेथील पोलीस अधिकारी जे नशेत होते, त्यांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन केले. मी सुरक्षेबाबत चिंतेत आहे. दिल्ली पोलीस बृजभूषणला का वाचवत आहे? दिल्ली पोलीस त्यांना अटक का करत नाहीये?”
आता या प्रकरणावर कधी तोडगा निघणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (wrestlers protest late night clash between wrestlers and police at jantar mantar vinesh phogat statement viral)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एका ओव्हरमध्ये 36 नाही, तर फलंदाजाने चोपल्या तब्बल ‘एवढ्या’ धावा, व्हिडिओ पाहून तोंडात घालाल बोटे
IPL संघांनो सावधान! 2 वर्ल्डकप जिंकणारा खेळाडू होणार KKRच्या ताफ्यात सामील, कोण आहे तो?