जगभरात कोरोना व्हायरसचे थैमान घातल्याने क्रीडा क्षेत्रही ठप्प पडले होते. पण आता हळू हळू क्रीडा क्षेत्र सुरळीत मार्गावर परतत आहे. अनेक क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा विविध देशात सुरु झाल्या आहेत. भारतातही महिला आणि पुरुष कुस्तीपटूंचे राष्ट्रीय शिबिर सुरु आहे. मात्र असे असतानाच शनिवारी(२१ नोव्हेंबर) रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने लखनऊमधील महिला राष्ट्रीय शिबिर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
डब्ल्यूएफआयचे सहायक सचिव विनोद तोमर यांनी रेसलिंग टीव्हीला सांगितले की ‘आत्तापर्यंत इथे मोजक्याच कुस्तीपटू आल्याने आम्ही हे शिबिर बंद करण्याचे ठरवले आहे.’
खरंतर हे शिबिर चालू झाल्यानंतर दिवळीसाठी कुस्तीपटूंना ५ दिवसांची सुट्टी देण्यात आली होती. तसेच त्यांना १८ नोव्हेंबरपर्यंत आपापल्या शिबिरासाठी दाखल होण्यास सांगितले होते. मात्र केवळ एशियन चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक मिळवणारी सरिता मोर आणि रौप्यपदक विजेती निर्मला देवी या दोघीच वेळेवर शिबिरासाठी पोहचल्या.
इतरांनी वेगवेगळ्या वैयक्तिक कारणास्तव फेडरेशनकडून शिबिरासाठी उशिरा दाखल होण्याची परवानगी मागितली. पण डब्ल्यूएफआयचा विश्वास आहे की यामुळे प्रशिक्षण प्रक्रियेस विलंब होईल, कारण कुस्तीपटू शिबिरासाठी दाखल झाल्यानंतर त्यांना क्वारंटाईनचे सर्व नियम पाळल्यानंतर सराव करता येणार आहे आणि म्हणूनच डब्ल्यूएफआयने शिबिर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
असे असले तरी सार्बिया येथे होणाऱ्या वैयक्तिक विश्वचषकासाठी जर भारत सहभागी होणार असेल तर नंतर हे शिबिर पुन्हा चालू होऊ शकते. ही स्पर्धा १२ ते १८ डिसेंबर दरम्यान होणार आहे.
तसेच सध्या सोनीपत येथे पुरुषांच्या राष्ट्रीय शिबिराला मात्र पुन्हा सुरुवात झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
वाढदिवस विशेष: भारताची स्टार कुस्तीपटू बबीता फोगटबद्दल खास ५ गोष्टी घ्या जाणून
…म्हणून दोनवेळचा ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमार सोडणार होता मॅटवरील कुस्ती
बजरंग पुनिया व्यतिरिक्त अन्य कुस्तीपटूंना मिळाली दिवाळीची सुट्टी