---Advertisement---

वृद्धिमान साहाने अफलातून कॅच तर घेतलेच पण हा मोठा पराक्रमही केलाय!

On: शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2019 5:08 PM
---Advertisement---

कोलकाता। आजपासून (22 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात इडन गार्डन्स स्टेडियमवर दिवस-रात्र कसोटी सामन्याला(Day-Night Test) सुरुवात झाली आहे. या सामन्यात बांगलादेशचा पहिला डाव 106 धावांत संपूष्टात आला आहे. या डावात भारताचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने दोन झेल घेत एक खास विक्रम केला आहे.

त्याने बांगलादेशच्या शादमान इस्लाम आणि महमुद्दुलाह यांचे यष्टीमागे झेल घेत यष्टीरक्षक म्हणून कसोटीत 100 विकेट्सचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे तो कसोटीत यष्टीमागे 100 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा 5 वा भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे.

याआधी असा पराक्रम एमएस धोनी, किरण मोरे, नयन मोंगिया आणि सईद किरमानी यांनी केला आहे.

साहाचे आता कसोटीमध्ये यष्टीरक्षक म्हणून 36 सामन्यात 101 विकेट्स पूर्ण झाल्या आहेत. यात त्याच्या 90 झेल आणि 11 यष्टीचीत विकेट्सचा समावेश आहे.

तसेच साहा कसोटीत यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय यष्टीरक्षकांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर धोनी असून त्याने यष्टीमागे 294 विकेट्स घेतल्या आहेत.

कसोटीमध्ये यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेणारे यष्टीरक्षक –

294 – एमएस धोनी (256 झेल, 38 यष्टीचीत)

198 – सईद किरमानी (160 झेल, 38 यष्टीचीत)

130 – किरण मोरे (110 झेल, 20 यष्टीचीत)

107 – नयन मोंगिया (99 झेल, 8 यष्टीचीत)

101 – वृद्धिमान साहा (90 झेल, 11 यष्टीचीत)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---