---Advertisement---

‘सहा तुम स्वाह होगये’, प्रसिद्ध कृष्णाने मधला स्टम्प उडवताच वृद्धिमान सहा ट्रोल

Wridhhiman-Saha
---Advertisement---

रविवारी (२९ मे) इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सला गुजरात टायटन्सपुढे विजय मिळवण्यासाठी मोठे लक्ष्य ठेवता आले नाही. राजस्थानने दिलेल्या १३१ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेला गुजरात टायटन्सचा सलामीवीर वृद्धिमान साहा स्वस्तात बाद झाला. त्याने लवकर विकेट गमावल्यामुळे गुजरात संघाचे चाहेत चांगलेच निराश झाले होते. सोशल मीडियावर याविषयीची नाराजी पाहिली जाऊ शकते.

राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील हा महत्वाचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली गेली. जगातील या सर्वात मोठ्या स्टेडियवर हा अंतिम सामना पाहण्यासाठी एक लाखापेक्षा अधिक प्रेक्षक उपस्थित होते. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने या सामन्याची नाणेफेक जिंकली आणि अप्रतिम फलंदाजीचा निर्णय घेतला. सॅमसनचा हा निर्णय गुजरातच्या गोलंदाजांनी पूर्णपणे चुकीचा ठरवला. मर्यादित २० षटकांमध्ये राजस्थानला अवघ्या १३० धावांवर समाधान मानावे लागले. यादरम्यान त्यांच्या ९ खेळाडूंनी विकेट्स गमावल्या.

प्रत्युत्तरात गुरजातची सलामीवीर जोडी वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) आणि शुबमन गिल यांनी खेळपट्टीवर आगमन केले. शुबमन गिल टिकून खेळला, पण साहाने मात्र स्वस्तात विकेट गमावली. साहाने या सामन्यात ७ चेंडू खेळले आणि यामध्ये ५ धावा करून तंबूत परतला. या ५ धावांमध्ये त्याच्या एका चौकाराचा देखील समावेश होता. साहाला प्रसिद्ध कृष्णाने डावाच्या दुसऱ्याच षटकात बाद केले. त्याने टाकलेल्या अप्रतिम चेंडूने साहाचा मधला त्रिफळा उडवला. त्यामुळे साहाला बाद व्हावे लागले.

विजायासाठी गुजरातला लक्ष्य जरी सोपे मिळाले असले, तरी सलामीवीर स्वस्तात बाद झाल्यामुळे चाहते चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. साहाविषयीच्या वेगवेगळ्या पोस्ट आणि मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर प्रथम गोलंदाजी करताना गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने टाकेलल्या ४ षटकांमध्ये १७ धावा खर्च केल्या आणि ३ महत्वाच्या विकेट्स घेतल्या. राजस्थानला निर्धारीत धावांवर रोखण्यासाठी हार्दिकची गोलंदाजी बऱ्याच अंशी कारणीभूत ठरली. त्याव्यतिरिक्त रविश्रीनिवासन साई किशोर याने २ षटकात २० धावा दिल्या आणि २ विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमी, यश दयाल आणि राशिद खान यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या. राजस्थानसाठी त्यांचा सलामीवीर जोस बटलरने सर्वाधिक ३९ धावांचे योगदान दिले.

महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

IPL 2022: गुजरात आणि राजस्थानने संयुक्तरीत्या कोरले ‘फेअर प्ले’ अवॉर्डवर आपले नाव; पाहा आजपर्यंतचे विजेते संघ

आयपीएल २०२२ मधील पुरस्कारांवर बटलरचेच वर्चस्व, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2022: फायनलमधील जबरदस्त फटकेबाजीमुळे हार्दिक पंड्या बनला सामनावीर, पाहा याआधीचे ‘मॅन ऑफ द मॅच’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---