आयपीएल 2020 चा हंगाम संपताच भारताचा संघ 12 जानेवारीला सिडनीसाठी रवाना होणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ तीन वनडे, तीन टी-20 आणि 4 कसोटी सामने खेळणार आहे. दरम्यान ‘हॅमस्ट्रिंग’च्या दुखापतीमुळे भारताचा यष्टीरक्षक वृद्धीमान साहा याला कदाचित कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागू शकते.
आयपीएल स्पर्धेदरम्यान सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू वृद्धीमान साहाने केवळ 4 सामन्यांत 214 धावा केल्या होत्या. जबरदस्त खेळ करत असताना हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर व्हावे लागले. त्याच्या दुखापतीची माहिती नाणेफेकीदरम्यान डेविड वॉर्नरने दिली होती. साहाच्या गुडघ्यातील स्नायूंना दुखापत झाल्याने तो ‘प्ले ऑफ’ सामन्यांनाही मुकला होता. आता याच कारणामुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी अडचण निर्माण झाली आहे.
साहा या दुखापतीतून केव्हापर्यंत सावरू शकतो?, यावरही अहवाल बनवून त्याच्या निवडीबाबत विचार केला जाऊ शकतो. ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका 17 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. त्यामुळे जवळपास एक महिना साहाकडे आहे. जर साहाची दुखापत गंभीर असेल, तर त्याच्याऐवजी रिषभ पंतला संघात खेळवले जाऊ शकते. बहुतांश विदेशी दौऱ्यासाठी साहापेक्षा पंतला सर्वाधिक पसंती दिली गेली आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ
भारतीय टी२० संघ: विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अगरवाल , केएल राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, टी नटराजन.
भारतीय वनडे संघ: विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अगरवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक).
भारतीय कसोटी संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अगरवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, वृद्धीमान साहा (विकेटकीपर), रिषभ पंत (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘हिटमॅन’ रोहित शर्माची बायोग्राफी झाली लाँच, जाणून घ्या सविस्तर
-RCB आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर विराटने बदललं वास्तव्य; पाहा काय आहे कारण
ट्रेंडिंग लेख-
-RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत
-मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
-आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा






