आयपीएल २०२१ च्या ४० वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान राॅयल्स या संघांमध्ये सोमवारी (२७ सप्टेंबर) खेळला गेला. सामन्यात प्रथम फलंदाजी करत राजस्थान राॅयल्सने २० षटाकात ५ विकेट्स गमावत १६४ धावा केल्या आणि राजस्थानला जिंकण्यासाठी १६५ धावांचे लक्ष्य दिले. सनरायझर्स हैदराबादने फलंदाजी करताना चांगले प्रदर्शन केले आणि १८.३ षटकात केवळ ३ विकेट्सच्या नुकसानावर १६७ धावा करत सामना जिंकला. यावेळी वृद्धीमान साहाच्या षटकाराने सर्वांचेच लक्ष वेधले.
हैदराबादने फलंदाजीची धमाकेदार सुरुवात केली होती आणि पावर प्लेमध्येच ५० धावा केल्या होत्या. यादरम्यान हैदराबादचे सलामीवीर जेसन राॅय आणि वृद्धिमान साहा या दोघांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. या दोघांच्या भागीदारीमध्ये एक षटकार असा मारला गेला आहे, जो चाहत्यांना खूपच आवडला आहे. हा षटाकर चाहते पुन्हा पुन्हा पाहत आहेत. हा शाॅट साहाने मारला होता.
साहाने हा षटकार हैदराबाद संघाच्या डावाच्या तिसऱ्या षटकामध्ये मारला होता. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात त्याचा पहिलाच सामना खेळणारा जयदेव उनादकट या षटकात गोलंदाजीसाठी आला होता. साहाने जयदेवच्या षटकातल्या पहिल्या शाॅर्ट चेंडूवर असा शाॅट खेळला ही तो चेंडू सीमारेषेपार ८३ मीटर अंतराबर जाऊन पडला.
साहाचा हा षटकार पाहून डगआउटमध्ये बसलेले हैदराबादचे सर्व खेळाडूंनीही टाळ्या वाजवून त्याला प्रोत्साहन दिले. असे असले तरी, साहा या सामन्यात केवळ १८ धावा करू शकला आणि महिपाल लोमरोरच्या चेंडूवर यष्टीचीत झाला.
साहाच्या षटकाराचा व्हिडिओ पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
सामन्यात राजस्थान राॅयल्ससाठी कर्णधार संजू सॅमसनने ५७ चेंडूत ८३ धावांची खेळी केली. तसेच हैदराबादसाठी जेसन राॅयने ४२ चेंडूत ६० आणि कर्णधार केन विलियम्सनने ४१ चेंडूत ५१ धावांची नाबाद खेळी केली. गुणतलिकेत सध्या राजस्थान राॅयल्स ६ व्या आणि सनरायझर्स हैदराबाद ८ व्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सनरायझर्सच्या विजयाचा नायक ठरलेल्या रॉयची सामनावीर ठरल्यानंतर भावुक प्रतिक्रिया, म्हणाला…
सनरायझर्सने तोडले वॉर्नरसोबतचे नाते! स्वतः दिली माहिती, उर्वरित आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता धूसर
प्ले ऑफ्ससाठी सात संघात जोरदार रस्सीखेच; अशी आहेत सर्व समीकरणे