---Advertisement---

पंत आणि साहामध्ये यष्टीरक्षणासाठी टक्कर? वृद्धिमान साहा म्हणतो, “शेवटचा निर्णय संघ…”

On: सोमवार, जानेवारी 25, 2021 1:54 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाच्या सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकांमध्ये वृद्धिमान साहा याची गणना केली जाते. परंतु आपल्या फलंदाजीमुळे तो सतत संघातून आत-बाहेर होत असतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऍडलेड कसोटीनंतर त्याला संघातून डच्चू देण्यात आला होता अन् त्याच्याजागी रिषभ पंतला संघात सहभागी करण्यात आले होते. परंतु सिडनी कसोटीत पंतला दुखापत झाल्याने साहाने यष्टीरक्षण करत अप्रतिम कामगिरी केली होती. तरीही सतत आपली पंतशी तुलना केली जात असल्याने साहाने नाराजी व्यक्त केली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत साहा म्हणाला की, “मी २०१८ पासून माझ्यात आणि पंतमध्ये तुलना केली जात असल्याचे पाहिले आहे. मी पंतच्या दमदार फलंदाजीमुळे अजिबात ताण घेत नाही. मी फक्त माझे काम करत असतो. यामुळे मी माझ्या खेळात तिळभरही बदल करणार नाही. आता संघ व्यवस्थापनालाच निर्णय घ्यावा लागेल की, यष्टीमागे कुणाला उभे करायचे?”

“यष्टीरक्षण हेच माझे काम आहे, खासकरून कसोटी क्रिकेटमध्ये आणि मी यात तज्ञ आहे असे मला वाटते. मी खात्रीने सांगू शकत नाही की, यष्टीमागे येणारा प्रत्येक झेल मी पकडू शकेल का नाही?. पण यातच माझा हातखंडा आहे. त्यामुळे मला भारतीय कसोटी संघाकडून यष्टीरक्षकाचीच भूमिका साकारायची आहे”, असे पुढे बोलताना साहाने सांगितले.

पंतला यष्टीरक्षण शैलीवर काम करण्याची गरज- साहा

पंतच्या यष्टीरक्षणाविषयी बोलताना साहा म्हणाला की, “सध्या पंत भारतीय कसोटी संघाकडून यष्टीरक्षण करत आहे. मला विश्वास आहे की, तो येत्या काळात आपल्या यष्टीरक्षण शैलीवर काम करेल. संघ व्यवस्थापनाला त्याच्यावर विश्वास आहे. पण त्यांनाही पंतच्या फलंदाजी किंवा यष्टीरक्षणामध्ये कोणत्या गोष्टीला अधिक प्राधान्य द्यायचे, याची जाणीव आहे.”

संयमाने संघात स्थान मिळण्याची वाट पाहीन- साहा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडचा भारत दौरा सुरु होणार आहे. या दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने होणार असून साहा आपल्याला संघात स्थान मिळण्याची प्रतिक्षा करेल, असे त्याने सांगितले आहे. “मी धीर खचनार नाही. मला इंग्लंडविरुद्धच्या येत्या कसोटी मालिकेत मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करण्याचा मी प्रयत्न करेन”, असे याविषयी बोलताना साहाने म्हटले आहे.https://twitter.com/cricbuzz/status/1353547316175593472?s=20

वृद्धिमान साहाची कसोटी कारकिर्द

साहाच्या कसोटी कारकिर्दीविषयी बोलायचे झाले तर, फेब्रुवारी २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध त्याने कसोटी पदार्पण केले होते. परंतु आजवर भारताकडून त्याला फक्त ३८ कसोटी सामने खेळायची संधी मिळाली आहे. दरम्यान ३ शतकांच्या मदतीने त्याने १२५१ धावा केल्या आहेत. सोबतच ७२ डावात यष्टीरक्षण करताना १०३ विकेट्स घेत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत टॉप-५ मध्ये स्थान मिळवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कुमार संगकारा राजस्थान रॉयल्स संघात सहभागी, पण खेळाडू म्हणून नाही तर…

एक मॅच होऊन जाऊ द्या! डब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार ट्रिपल एचचे टीम इंडियाला चॅलेंज

अविश्वसनीय! मार्टिन गप्टिलने घेतलेला हा भन्नाट झेल पाहून व्हाल थक्क, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---