---Advertisement---

188 विकेट्स अन् 2200 धावा, सारांश जैन कोण? 33 वर्षीय फिरकीपटूची श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात पहिल्यांदाच निवड

On: मंगळवार, जुलै 28, 2026 10:57 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मंगळवारी (28 जुलै) श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी 15 सदस्याच्या संघाची घोषणा केली आहे. संघात मध्य प्रदेशच्या सारांश जैनचा समावेश करण्यात आला आहे.

सारांश जैनची निवड ही एक उत्कृष्ट भर आहे; प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात मिळालेली ही पहिलीच संधी त्याने आपल्या कामगिरीच्या जोरावर सार्थ ठरवली आहे.

33 वर्षीय सारांशची देशांतर्गंत क्रिकेटमध्ये नियमितपणे खेळताना पहिल्यांदाच भारताच्या वरिष्ठ संघात निवड झाली आहे. वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त असल्याने सारांशला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली आहे. ऑफ-स्पिनर सुंदरला इंग्लंड दौऱ्यात दुखापत झाली होती, ज्यामुळे तो तिसऱ्या वनडे सामन्याला मुकला होता. आता तो श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला मुकला आहे.

इंदौरचा रहिवासी असलेल्या सारांशची प्रथम श्रेणीची कामगिरी प्रभावी आहे. त्याने गोलंदाजीबरोबर फलंदाजीतही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने प्रथम श्रेणीच्या 85 डावांमध्ये 2223 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 31.75 राहिली असून त्याने दोन शतकांसह 14 अर्धशतकेही केली आहेत.

सारांशने 97 प्रथम श्रेणीच्या डावांमध्ये गोलंदाजी करताना 188 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने एका डावात 10 वेळा चार विकेट्स आणि 10 वेळा पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

सारांश 2021 च्या रणजी ट्रॉफी विजेत्या मध्य प्रदेश संघाचा भाग होता. तसेच नुकतेच तो भारत अ संघाकडून श्रीलंका अ विरुद्ध खेळला आहे. यामधील दुसऱ्या सामन्यात त्याने नाबाद 70 धावा करताना सहा विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. हा सामना भारताने 10 विकेट्सने जिंकला होता.

जर सारांशला श्रीलंकेविरुद्ध अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले, तर तो 2021 मध्ये ब्रिस्बेन येथे वॉशिंग्टननंतर भारतासाठी पदार्पण करणारा पहिला ऑफ स्पिनर ठरेल. या मालिकेतील पहिला सामना 15 ते 19 ऑगस्टदरम्यान गॉल येथे आणि दुसरा सामना 23 ते 27 ऑगस्टदरम्यान कोलंबो येथे खेळला जाणार आहे.

भारताला श्रीलंकेविरुद्धही ही मालिका जिंकणे अत्यावश्यक आहे, कारण ही मालिका आयसीसी कसोटी अजिंक्यपद 2025-27 चा भाग आहे आणि भारत सध्या या स्पर्धेच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. तसेच श्रीलंका सहाव्या स्थानी आहे. (Who is Saransh Jain? The spinner has been selected for the Indian squad for the Test series against Sri Lanka for the first time)

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ- शुबमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत (विकेटकीपर), साई सुदर्शन*, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, जसप्रीत बुमराह*, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन. (*फिटनेसवर आधारित)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---