दोन वेळेचा आयपीएल विजेता संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) हा 300 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सपेक्षा अधिक ब्रॅंड व्हॅल्यू (मूल्य) असलेला जगातील पहिला क्रिकेट संघ ठरला आहे. तसेच आयपीएलचे व्यावसायिक मूल्यही 2.6 अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत वाढले आहे.
जागतिक गुंतवणूक बॅंक हौलिहान लोकी 2026 च्या ब्रॅंड व्हॅल्युएशनच्या अहवालानुसार, आयपीएलचे मूल्य 11.4 टक्क्यांनी वाढून 20.6 अब्ज अमेरिकी डॉलर्स (जवळपास 1.96 लाख कोटी रुपये) झाले आहे. RCB ने 312 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सच्या ब्रॅंड व्हॅल्यूसह आयपीएल फ्रॅंचायझींमध्ये आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
या यादीत मुंबई इंडियन्स 264 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सच्या ब्रॅंड व्हॅल्यूसह दुसऱ्या आणि कोलकाता नाईट रायडर्स 245 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सच्या ब्रॅंड व्हॅल्यूसह तिसऱ्या स्थानी आहे. चेन्नई सुपर किंग्ज 44 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सच्या ब्रॅंड व्हॅल्यूसह चौथ्या स्थानावर आहे.
RCBला पहिले आयपीएल विजेतेपद जिंकण्यासाठी तब्बल 18 वर्ष वाट पाहावी लागली. ऍंडी फ्लॉवर आणि मो बोबट यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षी एक ताकदवान संघ तयार करण्यात आला, ज्याचे उत्तम परिणाम दिसले. 2025 मध्ये पहिले विजेतेपद जिंकल्यानंतर संघाने 2026 च्या अंतिम सामन्यात RCB ने गुजरात टायटन्सचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. ही दोन्ही विजेतेपद संघाने रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली जिंकली.
आयपीएल पैसे कसे कमावते?
इंडियन प्रीमियर लीगचे आयोजन बीसीसीआयद्वारे केले जाते. ही लीग बीसीसीआयसाठी महसुलाचा एक प्रमुख स्रोत बनली आहे. मीडिया आणि प्रसारण हक्क, टायटल स्पॉन्सरशिप आणि अधिकृत भागीदारांकडून मिळणारा महसूल हे आयपीएलच्या महसुलाचे काही मुख्य स्रोत आहेत. (RCB has becomes the first cricket team to cross the $300 million mark in brand value)
सर्वात मौल्यवान आयपीएल फ्रॅंचायझी, (हौलिहान लोकी)
2025 मध्ये – RCB (269 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स).
2026 मध्ये – RCB (312 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स).






