---Advertisement---

वृद्धिमान साहाचे राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याचे दार कायमचे बंद! श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून होऊ शकतो बाहेर

On: बुधवार, फेब्रुवारी 9, 2022 4:24 PM
wriddhiman-saha
---Advertisement---

भारतातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा रणजी ट्रॉफी स्पर्धेला लवकरच सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व राज्यांनी आपल्या संघातील खेळाडूंची यादी जाहीर करायला सुरुवात केली आहे. दरम्यान भारतीय संघातील दिग्गज यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाने रणजी ट्रॉफी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बंगालच्या संघातून माघार घेतली आहे. काय आहे यामागील कारण? चला जाणून घेऊया.

याबाबत अधिक माहिती असणाऱ्या बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला म्हटले की, “संघ व्यवस्थापकातील सदस्यांनी वृद्धिमान साहाला स्पष्टपणे सांगितले आहे की, आता पुढे जायला हवं. तसेच ते रिषभ पंत सह बॅककप खेळाडू घडवण्याच्या प्रयत्नात आहेत. वृद्धिमान साहाला सांगण्यात आले होते की, त्याला श्रीलंका संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान दिले जाणार नाही. कारण आता केएस भारतला संघात स्थान देण्याची वेळ आली आहे.”

तसेच ते पुढे म्हणाले की, “कदाचित हेच कारण असावे की, वृद्धिमान साहाने बंगाल क्रिकेट असोसिएशनचे (सीएबी) अध्यक्ष अभिषेक डालमिया आणि संयुक्त सचिव स्नेहाशिष गांगुली यांना सांगितले आहे की, वैयक्तिक कारणास्तव तो रणजी ट्रॉफी स्पर्धेत सहभाग घेणार नाहीये. हेच कारण आहे की, आगामी रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी त्याला बंगालच्या संघात स्थान देण्यात आले नाहीये.

वृद्धिमान साहाची कारकीर्द

वृद्धिमान साहाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी मोलाचे योगदान दिले आहे. अनेकदा यष्टीमागे राहून त्याने भारतीय संघाला सामने जिंकून दिले आहेत. त्याने आतापर्यंत एकूण ४० कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने १३५३ धावा केल्या आहेत. तसेच यष्टिरक्षण करताना त्याने १०४ बळी घेतले आहेत. ज्यामध्ये १२ यष्टीचीत आणि ९२ झेलचा समावेश आहे. तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने १२२ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ४१.९८ च्या सरासरीने ६४२३ धावा केल्या आहेत. तसेच ९० लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याने ४२.४९ च्या सरासरीने २७६२ धावा केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :

भारतात विराटचा मोठा विश्वविक्रम; मास्टर-ब्लास्टर सचिनही पडला जवळपास ८०० धावांनी मागे

वेस्ट इंडिजच्या स्मिथचा भारताला दुहेरी धक्का, एकाच षटकात २ मोठ्या फलंदाजांना दाखवला तंबूचा रस्ता

आयपीएल: मुंबई-चेन्नईसह ७ संघांचे कर्णधार निश्चित, तर ‘हे’ ३ संघ अजूनही कर्णधाराच्या शोधात; पाहा यादी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---