भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना शुक्रवारी (३ डिसेंबर) सुरू होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडणार आहे. पहिला सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडला होता. हा सामना अनिर्णीत राहिला होता. या सामन्यादरम्यान भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे मुंबई कसोटीतील त्याच्या सहभागावर प्रश्नचिन्ह होते. परंतु, दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला विराट कोहलीने वृद्धिमान साहाच्या फिटनेसबाबत अपडेट दिली आहे. त्यानंतर वृद्धिमान साहाने देखील चाहत्यांसाठी एक खास मेसेज दिला आहे.
मालिकेतील दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला विराट कोहली म्हणाला की, “वृद्धिमान साहा आता तंदुरुस्त असून मानेच्या दुखापतीतून तो सावरला आहे. आम्ही हवामान आणि खेळपट्टीनुसार प्लेइंग ईलेव्हेन निश्चित करू.”
वृद्धिमान साहाने देखील चाहत्यांसाठी एक खास मेसेज दिला आहे. त्याने म्हटले की, “मी पूर्णपणे फिट आहे,आता पुढचा विचार करतोय..”
तसेच विराट कोहली पुढे म्हणाला की, “तुम्ही जितकं जास्त क्रिकेट खेळता तितकच जास्त तुम्ही या खेळाला समजता. हे त्या मानसिकतेबद्दल आहे की, तुम्हाला एका विशिष्ठ स्वरूपाचे क्रिकेट ठराविक पद्धतीने खेळायचे आहे.” विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सराव करत होता.
भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर होता. त्याचा ऐवजी पहिल्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेने संघाचे कर्णधारपद सांभाळले होते. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीचे पुनरागमन होणार आहे. पहिला कसोटी सामना हा अनिर्णीत राहिला होता. त्यामुळे दुसरा कसोटी सामना हा दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. तसेच विराट कोहलीचे पुनरागमन झाल्यानंतर प्लेइंग ईलेव्हेनमधून कुठल्या खेळाडूला बाहेर केले जाते,हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“अगदी मनासारखे घडलेय”; रिटेन झाल्यावर आली ‘स्पीडस्टार’ उमरानची पहिली प्रतिक्रिया
‘तुम्ही माझे आयुष्य बदलले’; ईशानने मुंबईसाठी पोस्ट केला भावनिक व्हिडिओ