भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया याच्यांत होणाऱ्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेस १७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. दोन्ही संघ या बहुप्रतिक्षित मालिकेसाठी तयारी करत आहेत. कसोटी मालकेपूर्वी भारत ३ दिवसीय सराव सामना खेळत आहे. यादरम्यान यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने पहिल्या आणि रिष पंतने दुसऱ्या सराव सामन्यात अफलातून कामगिरी केली. या खेळीने पुन्हा एकदा भारताचा यष्टीरक्षक कोण असावा?, अशी चर्चा सुरू झाली आहे. यातच माजी खेळाडू व सध्या समालोचक असलेले संजय मांजरेकर यांनी यष्टीरक्षकासाठी साहाला पसंती दिली आहे.
एका चाहत्याने मांजरेकर यांना साहा आणि पंत यांच्यापैकी पहिल्या कसोटीत यष्टीरक्षक म्हणून कोणाला संधी दिली पाहिजे?, असा प्रश्न विचारला होता. यावर प्रत्युत्तर देत आपल्या ट्विटर अकाउंटवरून मांजरेकर यांनी साहाला उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून पहिली पसंती दिली.
मांजरेकरांनी ट्वीट करत म्हटले की, “कसोटी क्रिकटमध्ये कौशल्य सर्वप्रथम येतात.” पंतवर निशाना साधत त्यांनी लिहिले की, “स्टीव स्मिथसारख्या खेळाडूचा झेल सोडल्यामुळे त्याने २०० धावा केल्या. अशा वेळी मी साहाला पसंती देईल. तसेच आपल्याला एक सर्वोत्तम यष्टीरक्षक हवा आहे. त्यामुळे आपल्याला साहाच पाहिजे.”
https://twitter.com/sanjaymanjrekar/status/1337199021975162881
भारताने खेळलेल्या २ सराव सामन्यातील पहिल्या सामन्यात वृद्धिमान साहा यष्टीरक्षक होता, तर दुसऱ्या सामन्यात रिषभ पंतकडे ही जबाबदारी दिली गेली आहे. पहिल्या सामन्यात साहाने उत्तम फलंदाजी करत अर्धशतक केले होते, तर दुसऱ्या सामन्यात पंतने आक्रमक शतकी खेळी केली. त्याने ७१ चेंडूत शतक ठोकले होते. त्यामुळे आता संघ व्यवस्थापनाच्या समस्येत वाढ झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेतून पाकिस्तानचा स्टार खेळाडू बाहेर
…तर ऑस्ट्रेलिया ४-० ने मालिका जिंकेल, माजी दिग्गज कर्णधाराची भविष्यवाणी
‘तुझ्या घरचेही तुझ्याबद्दल…’, ट्रोल करणाऱ्या चाहत्याला ‘गब्बर’चा दणका





