न्युयॉर्क रेड बूलचा फुटबॉलपटू ब्रॅडली राईट-फिलीप्सने अमेरिकेच्या मेजर लीग सॉकर(एम एल एस) या स्पर्धेत ऐतिहासिक सर्वात जलद 100 गोल केले.
न्युयॉर्क रेड बूल विरुद्ध डीसी युनाटेड या सामन्यात राईट-फिलीप्सने हा पराक्रम केला. हा सामना न्युयॉर्कने 1-0 असा जिकंला.
राईट-फिलीप्सने या हंगामातील त्याचा 14 वा आणि एम एल एस मधील 100 वा गोल हा सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला केला. 100 वा गोल केल्यावर त्याने त्याची 99 क्रमांकाची लाल जर्सी काढून 100 क्रमांकाच्या पांढऱ्या जर्सीचे अनावरण केले.
BWP, 💯 pic.twitter.com/ffwhiQAkG1
— New York Red Bulls (@NewYorkRedBulls) July 26, 2018
या स्पर्धेत 100 गोल करण्यास राईट-फिलीप्सला फक्त 159 सामने लागले. अशी कामगिरी करणारा तो 11वा फुटबॉलपटू ठरला.
यापूर्वी हा विक्रम न्यू इंग्लंड रिव्होलुशन फुटबॉल क्लबच्या टेलर ट्वेलमॅन यांच्या नावे होता. त्यांनी 174 सामन्यात 100 गोल केले होते.
✅ Cut.
✅ Meg.
✅ 100. pic.twitter.com/MNrdnN8QvN— New York Red Bulls (@NewYorkRedBulls) July 26, 2018
न्युयॉर्क रेड बूलने(13-5-2) सलग तीन तर मागील 7 पैकी 6 सामने जिंकले आहेत. तर डीसी युनाटेड या हंगामात पहिल्यांदाच घरच्या मैदानावर पराभूत झाला.
वेन रूनी याने दुसऱ्या सत्रात येऊन डीसी युनाटेडसाठी शेवटच्या काही मिनीटात गोल करण्याचे प्रयत्न केले.
महत्त्वाच्या बातम्या-
–ला लीगा नव्या हंगामातील रियल माद्रिद विरुद्ध बार्सिलोना सामन्यांच्या तारखा जाहीर
–जबरदस्त दुखापतग्रस्त असतानाही त्याने फिफा फायनलमध्ये केला गोल